Shah Rukh Khan Birthday: किंग खानचं जंगी सेलिब्रेशन! 'झूम जो पठाण' अन् 'रमैया नॉट वस्तावैय्या' वर थिरकला शाहरुख

Shah Rukh Khan Expresses Gratitude With Signature Pose and dances For Fans On His 58th Birthday at Dunki Event video viral
Shah Rukh Khan Expresses Gratitude With Signature Pose and dances For Fans On His 58th Birthday at Dunki Event video viral Esakal

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने 2 नोव्हेंबरला आपला 58 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या करोडो चाहत्यांनीही शाहरुखच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केले आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शाहरुखने त्याचा 58 वा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला.

किंग खानसाठी मुंबईत एका ग्रँड बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

त्यातच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात शाहरुख 'डंकी' चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे. यावेळी स्टेजवर त्याच्यासोबत डिंकीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानीही त्याच्यासोबत आहेत.

व्हिडिओंमध्ये शाहरुखने पांढऱ्या टी-शर्टसह निळ्या रंगाचा डेनिम घातला आहे. या लूकमध्ये किंग खान नेहमीसारखा कुल दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहरुख साठीच्या जवळ गेला आहे यावर चाहत्यांचा विश्वास बसणार नाही.

Shah Rukh Khan Expresses Gratitude With Signature Pose and dances For Fans On His 58th Birthday at Dunki Event video viral
Saira Banu : 'मला मुलगा असता तर तो....'! सायरा बानो शाहरुखला शुभेच्छा देताना झाल्या भावूक

शाहरुखने चाहत्यांसोबत डॉंकी ड्रॉप 1 पाहिला आणि त्याच्या शैलीत नृत्य केले. सध्या शाहरुखचा हाय एनर्जी परफॉर्मन्स करतानाचा एक व्हिडिओ वेगानं सोशल मिडियावर व्हायरल होत आहे . यावेळी तो पठाणच्या 'झूमे जो पठाण' या गाण्यावर आणि 'जवान'मधील 'रमैया नॉट वस्तावैया' या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसला.

तर एक व्हिडिओ शाहरुख खानने देखील त्याच्या सोशल मिडियावर शेयर केले आहे. ज्यात शाहरुख खानने कॅप्शनमध्ये लिहिले - 'तुमच्यासोबत सेलिब्रेट करणं नेहमीच खास होते. माझा दिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद. याआधी शाहरुख खान देखील ड्राईव्हसाठी गेला होता .

Shah Rukh Khan Expresses Gratitude With Signature Pose and dances For Fans On His 58th Birthday at Dunki Event video viral
SRK Birthday: जेव्हा मुक्ता बर्वेला शाहरुखने हात देऊन स्टेजवर आणलं होतं, पाहा व्हिडीओ

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. काल शाहरुखने दोनवेळा चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

संध्याकाळी शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये त्याने चाहत्यांसोबत केक कापला, डान्स केला आणि सेलिब्रेशन केले. यावेळी शाहरुखने त्याची DDLJ ची ती आयकॉनिक पोझ दाखवली.

खास निमित्त किंग खानने त्याच्या बी-टाऊन मित्रांसाठीही एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व सेलिब्रिटी खूप उत्सुक होते. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह तिच्या ग्लॅमरस गर्ल गँगसोबतचा एक फोटो शेअर केला आहेत. सध्या सोशल मिडियावर शाहरुखच्या बर्थ पार्टीची चर्चा आहे.

Shah Rukh Khan Expresses Gratitude With Signature Pose and dances For Fans On His 58th Birthday at Dunki Event video viral
Piyush Pal Death: 30 वर्षीय फिल्ममेकरचा मृत्यु, रक्ताच्या थारोळ्यात हायवेवर, मदत करायचं सोडुन लोकांनी...

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर शाहरुखच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com