Jawan VS Spider-Man : 'स्पायडर मॅन शाहरुखच्या जवानला तर खांद्यावर घेऊन जाईल!'

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाणला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
Shah Rukh Khan Jawan Movie Spider Man box office
Shah Rukh Khan Jawan Movie Spider Man box office esakal

Shah Rukh Khan Jawan Movie Spider Man : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाणला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तब्बल हजार कोटींची कमाई करुन या चित्रपटानं मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. राजामौलींच्या आरआरआरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे काम पठाणनं केला. यासगळ्यात आता वेगळीच बातमी समोर आली आहे.

येत्या काळात शाहरुखचा जवान नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामध्ये शाहरुख वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. पठाणच्या मोठ्या यशानंतर शाहरुखच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरवर प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव झाला आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटाच्या जोडीला हॉलीवूडचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होतो आहे. तो चित्रपट स्पायडर मॅन आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शाहरुखचा जवान आणि स्पायडर मॅन यांच्या नावाची चर्चा आहे. जुनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याचवेळी सोनी पिक्चर्सचा अॅनिमेशन मुव्ही स्पायडर मॅन- अक्रॉस द स्पायडर मॅन व्हर्स प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटांमधून कोण बाजी मारणार असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. पठाणनंतर शाहरुखचा जवान हा अतिशय महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Shah Rukh Khan Jawan Movie Spider Man box office
Shah Rukh Khan: 'यार गौरी तू...', शाहरुख खानने गौरी खानच्या पोस्टवर केली मजेशीर कमेंट

शाहरुखच्या जवानमध्ये दीपिकाची पाहुण्या कलाकाराची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. असं म्हटलं जात आहे की, बॉक्स ऑफिसवर स्पायडर मॅन आणि जवानमध्ये लढत होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये कुणाची सरशी होणार हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे. यापूर्वी शाहरुखच्या पठाणनं जगभरातून एक हजार कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. तर बॉक्सऑफिसवर ५४३ कोटींची कमाई केली आहे.

Shah Rukh Khan Jawan Movie Spider Man box office
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा बॉयफ्रेंड कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com