शाहरुख खान लवकरंच सुरु करणार 'या' सिनेमाचं शूटींग

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 12 October 2020

किंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख लवकरंच त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग सुरु करणार आहे.

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. आता किंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख लवकरंच त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग सुरु करणार आहे. या सिनेमाच्या बाबतीत अजुन कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखच्या या सिनेमाची चर्चा आहे की त्यने सिद्धार्थ आनंदचा आगामी 'पठान' हा सिनेमा साईन केला आहे.  

हे ही वाचा: नेहा कक्करनंतर आदित्य नारायण झाला लग्नासाठी तयार, 'या' अभिनेत्रीसोबत घेणार सात फेरे  

असं म्हटलं जात आहे की या ऍक्शन थ्रीलर सिनेमाचं शूटींग नोव्हेंबर महिन्यात सुरु होऊ शकतं. पहिले या सिनेमाचं शूटींग मे-जून मध्ये सुरु होणार होतं. मात्र कोरोना व्हायरसच्या कारणामुळे लॉकडाऊनमध्ये शूटींग पुढे ढकलण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार पहिला या सिनेमाचं शूटींग परदेशात होणार होतं मात्र आता या सिनेमाचा मोठ्या हिस्स्याचं शूटींग पहिले मुंबईत केलं जाईल. या सिनेमासाठी खूप महाग आणि शानदार सेट देखील तयार केला जात आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुखचा जो लांब केसांचा लूक समोर आला आहे तो याच सिनेमासाठी आहे. ;पठान; या सिनेमात शाहरुखसोबत जॉन अब्राहम, दीपिका पदूको देखील दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. आता सिनेमाची अधिकृत घोषणा होण्याची चाहते वाट पाहत आहेत.   

shah rukh khan may begin shooting of his next film pathan in november  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan may begin shooting of his next film pathan in november