दुबई स्टेडिअममध्ये झळकला शाहरुखचा नवा लूक अन् चाहते झाले फिदा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 1 October 2020

दुबई स्टेडिअममध्ये शाहरुखसोबत त्याचा मुलगा आर्यन देखील दिसून आला. यादरम्यान शाहरुखचे काही फोटो सोशल मिडियावर ट्रेंड होतायेत ज्यात तो नव्या लूकमध्ये पाहायला मिळतोय.  

मुंबई- शाहरुख खान सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये बुधवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये सामना रंगला होता. हा सामना पाहायला खास शाहरुख खान मुंबईहून दुबईला पोहोचला होता. दुबई स्टेडिअममध्ये शाहरुखसोबत त्याचा मुलगा आर्यन देखील दिसून आला. यादरम्यान शाहरुखचे काही फोटो सोशल मिडियावर ट्रेंड होतायेत ज्यात तो नव्या लूकमध्ये पाहायला मिळतोय.  

हे ही वाचा: ऐश्वर्याला जेव्हा विचारलं गेलं, १० लाख डॉलर मिळाले तर काय करशील? 'हे' होतं विश्वसुंदरीचं उत्तर  

शाहरुख खान बुधवारी त्याच्या टीमचा हा सामना पाहण्यासाठी पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यनसोबत पोहोचला होता. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सनी जिंकुन शाहरुखला चांगलं गिफ्ट दिलं. मात्र यासगळ्यात चर्चा होत होती ती शाहरुखच्या नव्या लूकची. लॉकडाऊनमध्ये शाहरुखचा लूक खूपंच बदललेला दिसून आला आणि शाहरुखच्या या लूकमध्ये आणखी कमाल करत होती ती म्हणजे त्याची जांभळ्या रंगाची टोपी. विशेष म्हणजे या फोटोत शाहरुखचे वाढलेले केस दिसून आले. इतकंच नाही तर सोशल मिडियावर शाहरुखच्या या लांब केसांमुळे तो महेंद्रसिंह धोनी लूकमध्ये दिसत असल्याची जोरदार चर्चा होत होती. 

एका व्हिडिओमध्ये शाहरुख स्वतः त्याचे वाढलेले केस दाखवत होता. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर येताच चाहते त्याच्या या नवीन लूकची खूप स्तुती करायला लागले आहेत. त्याने या जांभळ्या टोपीसोबत केकेआरचा स्पेशल मास्क देखील घातला होता. चाहत्यांना किंग खानला इतक्या दिवसांनी टीव्हीवर पाहुन खूप आनंद झाला होता.

काहींनी म्हटलं 'लक्ष द्या बादशाह आला आहे', काहींनी म्हटलं 'मॅच जिंकण्यासाठीचा लक' तर कोणी म्हणालं 'शाहरुख जबरदस्त हॉट दिसत आहे.' शाहरुखचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हायला लागले आहेत.    

shah rukh khan new hairstyle with long hair look gone viral during ipl match at dubai cricket stadium  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan new hairstyle with long hair look gone viral during ipl match at dubai cricket stadium