ऐश्वर्याला जेव्हा विचारलं गेलं, १० लाख डॉलर मिळाले तर काय करशील? 'हे' होतं विश्वसुंदरीचं उत्तर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 1 October 2020

१९९४ मध्ये एका मुलाखतीत मिस वर्ल्डचा ताज घातल्यानंतर ऐश्वर्याला एक प्रश्न विचारला गेला ज्याचं उत्तर देत तिने अनेकांची मनं जिंकली होती.

मुंबई- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ऐश्वर्याला इंडस्ट्रीमधील ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखलं जातं. ऐश्वर्याने १९९४ मध्ये 'मिस वर्ल्ड' हा किताब मिळवला होता. हा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिने तिच्या कामातून खूप नाव कमवलं. बॉलीवूडमध्ये 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' सारख्या एकापेक्षा एक हिट सिनेमांमध्ये काम केलं. एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतही ऐश्वर्याचे पाय आजही जमिनीवर आहेत.   

हे ही वाचा: अभिषेक बच्चनला यूजरने विचारलं, ड्रग्स आहेत का? ज्युनिअर बच्चनने उत्तर देत केली बोलती बंद  

'मिस वर्ल्ड' घोषित झाल्यानंतरही तिने तिचा डाऊन टू अर्थ हा स्वभाव बदलेला नाही. १९९४ मध्ये एका मुलाखतीत मिस वर्ल्डचा ताज घातल्यानंतर ऐश्वर्याला एक प्रश्न विचारला गेला ज्याचं उत्तर देत तिने अनेकांची मनं जिंकली होती. 'जर कोणी तुला १० लाख डॉलर एवढी रक्कम दिली तर तु काय करशील? असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला तेव्हा या विश्वसुंदरीने उत्तर दिलं, 'मी खूप हुरळुन जाणार नाही. मी त्याचा योग्य उपयोग करेन कारण ही रक्कम खूप जास्त आहे आणि तुम्हाला याचा नक्कीच विचार केला पाहिजे की एवढ्या रकमेचं काय केलं जाईल. कारण तुम्ही नेहमीच मजा मस्ती, मजा मस्ती आणि मजा मस्ती करु शकत नाही. कारण एका वेळेनंतर तुम्हाला याचा विचारंच करावा लागेल की तुम्ही याचं कराल तरी काय?'

ऐश्वर्या पुढे म्हणाली की, 'मी नाही म्हणणार की हे केवळ या किताबामुळे आहे पण तुम्हाला या रक्कमेचा प्रामाणिकपणे त्यासाठी देखील वापर करायला हवा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कारण पैश्यांचं काय ते येतात तसे जातात देखील. तु

ला खरा आनंद कशात मिळतो? या प्रश्नाचं उत्तर एका वाहिनीला देताना ती म्हणाली होती की, लोकांपर्यंत पोहोचणं. तुम्ही आनंद पैश्यांनी विकत घेऊ शकत नाही, तुम्ही दुस-यांची मदत करु शकता आणि त्यपासुन आनंद मिळवू शकता.'ऐश्वर्याचं म्हणणं आहे की जगात पैसा खूप मोठी भूमिका बजावतो कारण त्याने सगळ्या सुविधा मिळतात. मात्र तुम्ही लोकांना मदत करुन देखील थोडा आनंद मिळवू शकता.    

when miss world aishwarya rai was asked what would you do if someone gave you a million dollar  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when miss world aishwarya rai was asked what would you do if someone gave you a million dollar