'जमिनीवर राहायचे असेल तर..' पराभवानंतर शाहरुख खानची खास पोस्ट.. | Shah Rukh Khan pens uplifting message on twitter for his team KKR after defeat by RR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shahrukh khan twits on yesterdays defeat

'जमिनीवर राहायचे असेल तर..' पराभवानंतर शाहरुख खानची खास पोस्ट..

IPL 2022 : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे क्रिकेट प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. गेली काही वर्ष होणाऱ्या आयपीएल सामन्यात त्याची स्वतःची कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) ही टीम खेळते आहे. यंदा वर्षी होणाऱ्या सामन्यातही कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) दमदारपणे खेळत आहे. पण नुकत्याच झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (RR) संघांकडून कोलकत्ता नाईट रायडर्सचा पराभव करण्यात आला. हा सामाना अत्यंत चुरशीचा झाला. यावेळी कोलकत्ता संघाने सामना हरला असला तरी लोकांची मनं मात्र जिंकली.

हेही वाचा: इंडियन आयडलच्या महाअंतिम सोहळ्यात थिरकणार अमृता, उद्या ठरणार महाविजेता..

अशावेळी संघाच्या मालकाने खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. असेच प्रोत्साहन शाहरुख खान याने आपल्या संघाला दिले आहे. शाहरुखने (shah rukh khan) ट्विट करून लिहिलेल्या मजकुराने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. पराभवानंतरही शाहरुख, संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडूंचे कौतुक करतो. शाहरुख म्हणतो, 'तुम्ही खूप उत्कृष्ट खेळलात... कर्णधार श्रेयस अय्यर, गोविन्दाज उमेश यादव आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज आरोन फिंच आणि अभूतपूर्व कामगिरी केली. तसेच गोलंदाज सुनील नरेन याचं अभिनंदन, कारण हा त्याचा १५०वा सामना होता. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याचेही १५ वर्षांपूर्वीच्या एका खेळासाठी अभिनंदन. मला माहित आहे की आम्ही हरलो पण जर आपल्याला जमिनीवर राहायचे असेल तर हा त्याचा एकमेव मार्ग आहे! खेळाडूंनो.. तुमची मान ताठ ठेवा ठेवा,' असे ट्विट किंग खानने केले आहे.

हेही वाचा: प्राजक्ता माळीला चाहता म्हणतोय... 'ओगं माझं पिल्लू', एकाने तर चक्क...

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सात धावांनी विजय मिळवला. केकेआरला दोन विकेट्स शिल्लक असताना ११ धावांची गरज होती परंतु वेगवान गोलंदाज शेल्डन जॅक्सन याने उमेश यादवला बाद करून राजस्थानला विजय मिळवून दिला. हा राजस्थानचा यंदाच्या सामन्यातील चौथा विजय आहे. आता केकेआर विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना २३ एप्रिल रोजी रंगणार आहे.

Web Title: Shah Rukh Khan Pens Uplifting Message On Twitter For His Team Kkr After Defeat By Rr

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..