शाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर सोशल मीडियावर 'हिट'! 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर काल (शुक्रवार) प्रसिद्ध झाला. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. 

या चित्रपटामध्ये शाहरुख एका बुटक्‍या माणसाच्या भूमिकेत आहे. 'झिरो'चं पहिले पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर या चित्रपटाची आणि शाहरुखच्या भूमिकेची ऑनलाईन विश्‍वात प्रचंड चर्चा झाली.

व्हीएफएक्‍सचा वापर, शाहरुखचा भन्नाट 'लूक' आणि अनुष्काचा वेगळा अवतार यामुळे 'झिरो'चा ट्रेलर अवघ्या काही तासांमध्येच 'हिट' झाला आहे. एका दिवसातच या ट्रेलरचे अडीच कोटींहून अधिक 'व्ह्यूज' झाले आहेत. 

'झिरो'चं संगीत अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीचे आहे. 

ट्रेलरमधील संवादांवरून ट्विटरवर अनेक विनोदही निर्माण झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khan starring Zero trailer gains big on social media