शाहरुख खानने सुरु केली शूटींग? 'मन्नत'च्या बाल्कनीमध्ये शूटींग करतानाचा व्हिडिओ व्हायरल

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

सोशल मिडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मुंबईमधील मन्नत या त्याच्या बंगल्यातील बाल्कनीमध्ये शूटींग करताना दिसून येत आहे.

मुंबई- मुंबईमध्ये शुक्रवारपासून टीव्ही शोच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शूटींगला सुरुवातही झाली आहे. यासोबतंच बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने देखील त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मुंबईमधील मन्नत या त्याच्या बंगल्यातील बाल्कनीमध्ये शूटींग करताना दिसून येत आहे. या छोट्या व्हिडिओ क्लीपमध्ये अनेक मोठे कॅमेरे आणि लाईट देखील दिसत आहेत.

हे ही वाचा: नवाझुद्दीन सिद्दीकीने पत्नी आलियाला पाठवली नोटीस

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानने चेक्स शर्ट आणि जीन्स असा पेहराव घातला आहे. शूटींग दरम्यान शाहरुख त्याचा एक हाथ सारखा वर करत आहे. घोषणाबाजी देताना जसा सारखा हात वर करतात तशी ऍक्शन करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. शाहरुख खान नेमक्या कोणत्या प्रोजेक्टसाठी शूटींग करत आहे हे अजून कळू शकलेलं नाही.

शाहरुख खानचे चाहते त्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. लोकांना त्याच्या आगामी सिनेमाविषयी जाणून घेण्याची देखील खूप उत्सुकता आहे. 

शाहरुख खानचा हा व्हिडिओ त्याच्या फॅनक्लबच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ शेअर करताना असं कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'किंग खान बाल्कनीमध्ये दिसून आला. कोणी अंदाज बांधू  शकतं का की नेमकं काय सुरु आहे ?'

शाहरुख एक वर्षापेक्षा जास्त वेळ मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मात्र त्याच्या प्रोडक्शन कंपनीने यादरम्यान अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शाहरुख २०१८ मध्ये 'झिरो' या सिनेमात शेवटचा दिसून आला होता. सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेव्हापासून शाहरुख चांगल्या स्क्रीप्टची वाट पाहत आहे.   

shah rukh khan start shooting at mannat for a project video viral on social media


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan start shooting at mannat for a project video viral on social media