शाहरुखच्या ट्विटवर अभिनेत्री म्हणाली, 'गांधीजींनी आम्हाला खरं बोलायला शिकवलंय'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 3 October 2020

शाहरुख सध्या सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. त्याने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने एक ट्विट केलं होतं जे खूप चर्चेत राहिलं. मात्र त्याच्या या ट्विटवर अभिनेत्री सयानी गुप्ताने निशाणा साधलाय.  

मुंबई- शाहरुख खान सध्या त्याच्या केकेआर टीमला आयपीएल २०२० मध्ये चीअरअप करण्यासाठी दुबईमध्ये आहे. मॅचच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे शाहरुख सध्या सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. त्याने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने एक ट्विट केलं होतं जे खूप चर्चेत राहिलं. मात्र त्याच्या या ट्विटवर अभिनेत्री सयानी गुप्ताने निशाणा साधलाय.  

हे ही वाचा: प्रियांका चोप्राने रिलीज केलं तिचं पुस्तक, १२ तासाच्या आत Unfinished बनलं नंबर वन  

शाहरुख खानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'या गांधी जयंती निमित्त जर तुम्हाला तुमच्या मुलांना काही सांगायचं असेल किंवा शिकवायचं असेल तर असं काहीतरी सांगा जे त्यांच्या चांगल्या वाईट दिवसात कामी येईल. ते म्हणजे वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका आणि वाईट ऐकू नका. गांधीजींच्या १५१ व्या जयंती निमित्त सत्याचं महत्व लक्षात ठेवा.' शाहरुख खानच्या या ट्विटनंतर अभिनेत्री सयानी गुप्ता हिने प्रतिक्रिया दिली आहे. 

सयानीने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'सत्य बोलणं चांगलं आहे. गांधीजींनी आम्हाला हे देखील शिकवलं आहे की सत्यासाठी बोललं पाहिजे. पिडीतांसाठी आवाज उठवला पाहिजे. दलित भाऊ-बहिणींच्या हक्कासाठी बोललं पाहिजे. फक्त आपले डोळे आणि कान बंद करुन चालणार नाही.'

सयानी गुप्ताने असा शब्दात शाहरुख खानच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानच्या कामाबाबत बोलायचं झालं तर तो 'झिरो' या सिनेमात शेवटचा दिसला होता. या सिनेमात शाहरुख खानसोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होत्या.    

shah rukh khan tweet on gandhi jayanti actress sayani gupta reaction goes viral on internet  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan tweet on gandhi jayanti actress sayani gupta reaction goes viral on internet