सिनेमातून रिटायर कधी होणार? या चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलं भन्नाट उत्तर...

srk
srk
Updated on

मुंबई- शाहरुख खानचे गेले काही सिनेमे एकानंतर एक फ्लॉप होत गेलेले पाहायला मिळाले..त्यामुळे आता शाहरुख खानने सिनेमांमधून संन्यास घेतला पाहिजे? असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर खुद्द शाहरुख खानने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे..नुकतंच शाहरुखने ट्वीटवर #AskSRK सेशन घेतलं होतं..या सेशन दरम्यान शाहरुख नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर देताना दिसतो..विशेष म्हणजे शाहरुख त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरने त्याच्या चाहत्यांना खुष करत असतो..याच सेशन दरम्यान एका नेटक-याने शाहरुखला गेल्या काही फ्लॉप सिनेमांचा संदर्भ देत विचारलं की, 'हीच ती योग्य वेळ आहे तुम्ही सिनेमामधून रिटायरमेंट घेण्याची असं तुम्हाला वाटत नाही का?' यावर शाहरुखने दिलेले भन्नाट उत्तर पाहून तुम्हीही त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक कराल..

शाहरुखने चाहत्याच्या या खोचक प्रश्नाला उत्तर देत म्हटलं. 'माहित नाही, सुपरस्टार्सना विचारण्याचा प्रयत्न करा, कारण दुर्देवाने मी तर केवळ किंग आहे'. शाहरुखच्या या उत्तराला त्याचा चाहतावर्ग चांगलीच दाद देत आहे..

एवढंच नाही तर एका चाहत्याने शाहरुखला विचारलं, या लॉकडाऊन दरम्यान तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता? यावरही शाहरुखने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं. शाहरुखने लिहिलं, 'लोखसंख्या वाढवण्यात मी हातभार लावत नाही आहे कारण आधीच मला तीन मुलं आहेत..आणि ही तीनही मुलं माझ्यासाठी गिफ्ट पेक्षा कमी नाहीत..माझा पूर्ण दिवस त्यांच्यासोबत खेळण्यात जातो..आणि यातून जो वेळ उरतो तो त्यांची खेळणी आवरण्यात आणि साफ करण्यात जातो..' 

याशिवाय एका चाहत्याने या महिन्यात तुम्ही केव्हा घराबाहेर पडला होतात या प्रश्नावर शाहरुखने मी यावर्षी घरातून बाहेरंच पडलेलो नाही असं उत्तर दिलं..  

shah rukh khans reply to a fan who asks him when should a superstar call it quits  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com