Shah Rukh Khan: पठाण नंतर शाहरुख खानच्या घडाळ्याची चर्चा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

शाहरुख खानच्या मनगटात असलेल्या घडाळ्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं
shah rukh khan, pathaan
shah rukh khan, pathaanSAKAL

Shah Rukh Khan Pathaan: सामान्य माणसांना दिवसेंदिवस महागाईने नाकीनऊ आणले आहेत. महिनाअखेरीस एकेक पैसे खर्च करताना सामान्य माणूस हजार वेळा विचार करतो. पण इथे शाहरुख खान मात्र त्याच्या घड्याळासाठी कोट्यवधी खर्च करतो.

काहीच दिवसांपूर्वी पठाण ची सक्सेस पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी शाहरुखने एक इव्हेंट आयोजित केला होता. त्यावेळी ब्लॅक ड्रेस मध्ये असलेल्या शाहरुख खानच्या मनगटात असलेल्या घडाळ्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. सध्या पठाण नंतर शाहरुखच्या या घड्याळाची सगळीकडे चर्चा आहे.

(Shah Rukh Khan's watch is very expensive, you may be surprised )

shah rukh khan, pathaan
Pratiksha Mungekar: तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय.. खलनायिका असुनही प्रेक्षक तिच्या प्रेमात

पठाण निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी शाहरुख खान उपस्थित होता. त्यावेळी शाहरुख खानने निळ्या रंगाचं घड्याळ घातलं होतं. निळ्या रंगाच्या घड्याळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

इतकं आकर्षक घड्याळ नजरेस पडलं तर शाहरुखचे फॅन्स काही स्वस्थ बसणार नाही. या घड्याळाची किंमत नेमकी किती आहे अशी सर्व माहिती शाहरुखच्या फॅन्सनी काढली. आणि या छोटयाश्या घड्याळाची किंमत ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं

shah rukh khan, pathaan
DDLJ: गर्लफ्रेंड असेल तर तिला घेऊन जा... दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पुन्हा होतोय रिलीज

ऑडेमार्स पिगेट कंपनीचे हे घड्याळ आहे. हे त्यांचे रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत तब्बल ₹4.98 कोटी किमतीचे आहे. म्हणजे अंदाजे ५ कोटीचे असलेले हे घड्याळ साडे चार कोटींना विकले जाते. शाहरुख खानची श्रीमंती फक्त एवढ्यावर थांबत नाही.

शाहरुख खानच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं घर मन्नत. या घरची किंमत ₹200 कोटी इतकी आहे.याशिवाय दिल्लीतही शाहरुख खानचे एक आलिशान घर आहे. शाहरुखकडे बीएमडब्ल्यू 6 सीरीज, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, एक ऑडी आणि इतर कार आहेत. अशाप्रकारे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर शाहरुखने हि सर्व संपत्ती मिळवली आहे.

shah rukh khan, pathaan
Bigg Boss 16: शिव ठाकरे नाही तर फायनलसाठी हृता दुर्गुळे करतेय या सदस्याला सपोर्ट

दरम्यान शाहरुख खानचा पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला आहे. पठाणने आजवर ८५० पेक्षा जास्त कोटींची कमाई केलीय. पठाण लवकरच १००० किती क्लब मध्ये जाण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आणि या चित्रपटाने इतिहास रचला. किंग ऑफ रोमान्सचा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'पठाण' रिलीज झाल्यापासून चर्चत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com