esakal | Kabir Singh Trailer : 'व्हेरी व्हेरी अँग्री मॅन'च्या भूमिकेत शाहिद कपूर (व्हिडीओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Kapoor And Kiara Advani Starer Kabir Singh Trailer Released

दाक्षिणात्य चित्रपटात अर्जुन रेड्डीची मुख्य भूमिका साकारणारा विजय देवरकोंडा आणि कबीर सिंगच्या लूकमधील शाहिद कपूर हुबेहूब दिसत आहे.

Kabir Singh Trailer : 'व्हेरी व्हेरी अँग्री मॅन'च्या भूमिकेत शाहिद कपूर (व्हिडीओ)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

प्रेमात वेडं होऊनही अनेक उचापती करणाऱ्या नायक-नायिकांच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेतच. याच धाटणीचा पण थोडं जास्तच जहालपणा करणाऱ्या एका प्रेमवीराची कहाणी मोठ्या पडद्यावर अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे. 'कबीर सिंग' असे या चित्रपटाचे नाव आहे. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता शाहिद कपूर 'कबीर सिंग'मध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा हा हिंदी रिमेक आहे. 'अर्जुन रेड्डी' हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहेच. 'कबीर सिंग'चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर विशेष पसंती मिळत आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटात अर्जुन रेड्डीची मुख्य भूमिका साकारणारा विजय देवरकोंडा आणि कबीर सिंगच्या लूकमधील शाहिद कपूर हुबेहूब दिसत आहे. या चित्रपटात (कबीर) शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना शाहिद हा कियारा अडवाणीच्या (प्रीती) प्रेमात पडतो. परंतु प्रेयसी सोडून गेल्यानंतर तो व्यसनाधीन होतो. व्यसनाच्या नादात 'अँग्री यंग मॅन' असे कबीरचे व्यक्तीमत्त्व बनते. 

'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनीच 'कबीर सिंग'चेही दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट 21 जून ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

 

loading image