esakal | शाहिद मीराने हाती घेतली मोहिम; कोरोना संकटात मदतीचे आवाहन

बोलून बातमी शोधा

shahid kapoor and Mira Rajput
शाहिद मीराने हाती घेतली मोहिम; कोरोना संकटात मदतीचे आवाहन
sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

पुणे : देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रूग्णालयात वैद्यकिय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांना सामोरे जाऊन समाजातील ‘रियल हिरो’ म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स जोमाने काम करत आहे. अशा रियल हिरोला मदत करण्यासाठी आता अनेक कलाकरांनी मदत कार्य हाती घेतले आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द कलाकार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा रजपूतने देखील कोरोना रूग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

शाहिद आणि मीराने नुकतेच सोशल मीडियावर एक लाईव्ह सेशन केले. त्यामध्ये ‘Breathe For India’ आणि ‘Billion Breath Movement’या मोहिमेबद्दल माहिती दिली. ही मोहिम मीराची बहिण नूर आणि भाऊजी मोहनीश वधवानी यांनी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी मदत निधी जमा करण्याची जबाबदारी मीरा आणि शाहिदने घेतली आहे.

मीराने या लाईव्ह सोशनमध्ये या मोहिमेबद्दलची सर्व माहिती दिली. या सेशनमध्ये मीराने नूर आणि मोहनीशला आमंत्रित केले होते. मीरा आणि शाहिदने लोकांना मदत करण्याची विनंती केली. शाहिदने या लाईव्ह सेशनचा व्हिडीओ ‘Give India’ नावाच्या पेजवर शेअर केला. सोशल मीडियाचा योग्य वापर शाहिद आणि मीरा करत असल्याने त्यांच कौतुक होत आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या मदत कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना रूग्णांची मदत करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता आक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंक्कल खन्नाने देखील कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली. तसेच अजय देवगण, सलमान खान, आयुषमान खुराना, प्रिकांका चोप्रा या कलाकरांनी देखील कोरोना रूग्णांसाठी मदत कार्य हाती घेतले आहे.