'कबीर सिंग'वर झालेल्या टीकेनंतर शाहीदने दिले उत्तर, म्हणाला...

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

- अभिनेता शाहीद कपूरची भूमिका असलेला 'कबीर सिंग' हा चित्रपट जून महिन्यात झाला प्रदर्शित.

मुंबई : अभिनेता शाहीद कपूरची भूमिका असलेला 'कबीर सिंग' हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र, आता त्या चित्रपटावरून काही टीका केली जात आहे. त्यावर आता शाहीदने उत्तर दिले, की यामध्ये भूमिका करणाऱ्यांचा न्याय करणारे आपण कोण? 

'कबीर सिंग' हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. तर सिद्धार्थ सिंग यांच्यासह संदीप वांगा यांनी याचे लेखन केले आहे. यामध्ये शाहीद कपूर, कायरा अडवानी, सोनम मजूमदार यांची भूमिका आहे. 'कबीर सिंग' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 200 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची सगळ्या स्तरावरून स्तुती केली जात आहे. मात्र, त्यावरून काही टीका केली जात आहे.

एका मनोरंजन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, की मी याबाबत कोणतीही मुलाखत दिलेली नाही. कारण प्रत्येकजण आक्रमक झाला आहे. त्यामुळे मला आता वाटत नाही, की हे योग्य राहील. चित्रपट आता प्रदर्शित झाल्याने मला कोणतीही प्रसिद्धी करायची गरज नाही. यामध्ये भूमिका करणाऱ्यांचा न्याय करणारे आपण कोण? 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Kapoor on Kabir Singh Criticism Its So Hypocritical Who Are We to Judge Characters