TBMAUJ: शाहिद कपूर अन् क्रिती सेननच्या चित्रपटाला 'सेन्सॉर बोर्डाचा' दणका! 'त्या' गोष्टींवर घेतला आक्षेप, अन् शेवटी...

शाहिद अन् क्रिती सेननचा तेरी बातो में ऐसा उलझा जिया (Teri Baaton Mei n Aisa Uljha Jiya) नावाचा चित्रपट खरं तर उद्या प्रदर्शित होतो आहे.
eri Baaton Mei n Aisa Uljha Jiya
eri Baaton Mei n Aisa Uljha Jiyaesakal

TBMAUJ News : शाहिद अन् क्रिती सेननचा तेरी बातो में ऐसा उलझा जिया (Teri Baaton Mei n Aisa Uljha Jiya) नावाचा चित्रपट खरं तर उद्या प्रदर्शित होतो आहे. मात्र त्यावरील सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप हा कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी वेगवेगळ्या शब्दांवर आणि काही दृष्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते प्रकरण नेमकं आहे तरी काय हे आपण जाणून घेणार आहोत.

सीबीएफसीनं (CBFC) शाहिदच्या त्या चित्रपटाला काही महत्वाचे बदल सुचवले आहे. इंटीमेट सीन्ससोबत फाँट साईजबाबत देखील बोर्डानं बदल (Censor Borad) करण्यास सांगितले आहे. या चित्रपटाला बोर्डाकडून यु ए सर्टिफिकेट मिळाले आहे. उद्या (९ फेब्रुवारी) रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.

शाहिद कपूर च्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. एआय टेक्नोलॉजीची मानवी आयुष्यात झालेली एंट्री त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि त्याचा वाढणारा हस्तक्षेप यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. क्रिती सेनननं या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा या चित्रपटाला बोर्डाकडून युए सर्टिफिकेशन मिळाले होते. मात्र आता त्यात काही बदल सुचवण्यास सांगितले आहे.

बॉलीवूड हंगामान दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ने या चित्रपटातून काही इंटिमेट सीन्स कट करण्यास सांगितले आहे. बोर्डाच्या गाईडलाईन नुसार चित्रपटातील २५ टक्के इंटिमेट सीन्स काढण्यास सांगितले आहे. याशिवाय ३६ सेकंदचा जो एक इंटिमेट सीन होता तो कमी करुन २७ सेकंद इतका करण्यात आला आहे.

या शब्दावर घेतला गेलाय आक्षेप...

तेरी बातो में ऐसा उलझा जिया च्या उत्तरार्धात दारु या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. त्याऐवजी ड्रिंक असा शब्द वापरण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. तसेच स्मोकिंग सारख्या शब्दाला मोठ्या फाँटमध्ये लिहिण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सगळ्या बदलानंतर युए सर्टिफिकेशन दिलं आहे.

सीबीएफसीनं सांगितलेल्या बदलांनुसार हा चित्रपट वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा रनटाईम हा २ तास २३ मिनिटं आणि १५ सेकंद इतका करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी, आराधना शाह यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com