Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: अखेर शाहिद-क्रितीच्या चित्रपटाचं झालं नामकरण! या दिवशी येणार भेटीला!

शाहिद कपूर आणि क्रिती सेनन रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya:
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya:Esakal

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि शाहिद कपूर सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये केली जाते. एकीकडे क्रितीला 'मिमी'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर 'कबीर सिंग' सिनेमाने शाहिद कपूरच्या करिअरला गियर अप केले आहे.

सध्या हे दोघे रुपेरी पडद्यावर एकत्र येणार असल्याने यांची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि टायटल चाहत्यांना सांगितले आहे.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya:
Satyashodhak: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

यासोबतच या चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात क्रिती आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. आता क्रिती आणि शाहिदच्या या चित्रपटाचे नाव 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' असं ठेवण्यात आलं आहे.

क्रिती आणि शाहिदचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलिज होणार आहे. हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलिज होणार आहे.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya:
Annapoorani: "देवतांनी मांसाहार केला होता" नयनताराचा 'अन्नपूर्णी' वादाच्या भोवऱ्यात! मुंबईनंतर जबलपूरमध्ये एफआयआर दाखल

क्रितीने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले, 'या व्हॅलेंटाईन वीकमध्ये, एक अशक्य अशा प्रेमकथेचा अनुभव घ्या. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

शाहिद-क्रितीच्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाचे लेखक अमित जोशी आणि आराधना शाह आहेत. या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर आणि ज्योती देशपांडे करणार आहेत. आता चाहते या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी खुपच उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com