मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी शाहिद म्हणाला...

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

एका मुलाखती दरम्यान शाहिदने पत्नी मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी मत व्यक्त केलं आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये लव, अफेअर आणि लग्न यांच्या चर्चा सर्वधिक असतात. त्यातूनही बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्या चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये येतात. शाहिद कपूर आणि मीरा रजपूत ही एक जोडीदेखील चाहत्यांच्या पसंतीमध्ये अगदी टॉपवर आहे.

शाहिद आणि मीरा 2015 मध्ये विवाहबंधनात अडकले. असं असूनही शाहिदवर अनेक मुली आजही जीवापाड प्रेम करतात. तर मीराही तिच्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांच्या नजरेत असते. या जोडप्याला आता दोन गोंडस मुलं आहेत. शाहिद आणि मीरा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलगी मीशा आणि झेनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मीराचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध नसला तरी जाहिरातींच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. साहजिकच तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी अनेकदा प्रश्न केले गेले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

एका मुलाखती दरम्यान शाहिदने पत्नी मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी मत व्यक्त केलं आहे. शाहिद म्हणाला, ' चित्रपटामध्ये काम करावं की नाही? हा सर्वस्वी मीराचा निर्णय असेल. लग्नानंतर एका वर्षातच आम्हाला मुलगी झाली. त्यानंतर आता मुलगाही आहे. दोन मुलांना सांभाळताना इतर कामांकडे वेळ देणे तिच्यासाठी आता तरी कठीण आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy New Year 2019

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

मीराने काम करण्याविषयी शाहिदने पूर्णपणे नकार दिला नसून तो पुढे म्हणाला, 'मीराचं वय आता फक्त 25 आहे. अजून एक- दोन वर्षांनी तिला मोठ्या जबाबदाऱ्यांची म्हणजेच मुलांना लक्ष देण्याची गरज आहेच. पुढे काय करायचं आहे याचा विचार करण्यासाठी तिच्याकडे खूप वेळ आहे. त्याप्रमाणे तिला काय करायचे आहे, ते ती नक्कीच करु शकते.' 

आता मीरा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार का? आणि कधी करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. शाहिदच्या विधानावर मीराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एकीकडे शाहिद आणि मीराला प्रचंड पसंती मिळत असली तरी दुसरीकडे नेटकऱ्यांनी मीराला अनेकदा ट्रोल केलं आहे. कमी वयात तिने लग्न केलं. शिवाय ती दोन मुलांची आई झाली, यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.

शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर शाहिदने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Kapoor spoke about debut of Wife Mira Rajput