कबीर सिंगने सलमानच्या 'भारत'चाही तोडला रेकॉर्ड

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

कबीर सिंगने सलमान खानच्या भारत चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकले असून या चित्रपटाने केवळ 13 दिवसांमध्ये 200 कोटींचा पल्ला पार केला आहे. सलमानच्या भारतने 14 दिवसांमध्ये 200 कोटींचा पल्ला पार केला होता.
 

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने सलमान खानच्या भारत चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकले असून या चित्रपटाने केवळ 13 दिवसांमध्ये 200 कोटींचा पल्ला पार केला आहे. सलमानच्या भारतने 14 दिवसांमध्ये 200 कोटींचा पल्ला पार केला होता.

दरम्यान, शाहिद कपूरच्या करिअरमधील 200 कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर सिंग हा चित्रपट 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला. केवळ पाच दिवसांतच या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली. आयुषमान खुरानाच्या आर्टिकल 15 या चित्रपटाला कबीर सिंग चांगलीच टक्कर देत आहे. अर्जुन रेड्डीने बॉक्स ऑफीसवर जितकी कमाई केली होती, त्याहून अधिक कमाई कबीर सिंगने अवघ्या तीन दिवसांत केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Kapoor's film surpasses Rs 200 crore