Gautami Patil: दुसऱ्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तरी चालेल पण.. गौतमी पाटील प्रकरणावर संभाजी भगत रोखठोक

गौतमी पाटीलचे आडनाव, तिची लावणी अशा अनेक गोष्टींवर सध्या मोठा वाद सुरु आहे. याच मुद्द्यावर संभाजी भगत यांनी पोस्ट केलीय.
gautami patil, sambhaji bhagat, gautami patil news, sambhaji bhagat on gautami patil
gautami patil, sambhaji bhagat, gautami patil news, sambhaji bhagat on gautami patilSAKAL

शाहीर संभाजी भागत हे त्यांच्या गाणी आणि परखड शैलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. सध्या संभाजी भगत यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालीय. ही पोस्ट आहे गौतमी पाटील बद्दल. गौतमी पाटीलचे आडनाव, तिची लावणी अशा अनेक गोष्टींवर सध्या मोठा वाद सुरु आहे. याच मुद्द्यावर संभाजी भगत यांनी पोस्ट केलीय.

संभाजी भगत लिहीतात... नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण .... ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे ...नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!

आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!

(shahir sambhaji bhagat shared post about lavani dancer gautami patil )

gautami patil, sambhaji bhagat, gautami patil news, sambhaji bhagat on gautami patil
The Kerala Story चे दिग्दर्शक Sudipto Sen हॉस्पीटलमध्ये दाखल, अचानक बिघडली तब्येत

संभाजी भगत पुढे लिहीतात..पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??

संभाजी भगत शेवटी लिहीतात.. मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com