'पंजाबची कतरिना कैफ' हे टायटल शेहनाज गिलने हटवण्यामागे काय आहे खरं कारण?

टीम ई सकाळ
Wednesday, 24 June 2020

सलमानने शेहनाजला पंजाबची कतरिना कैफ म्हटल्यावर चाहते तिला या नावाने ओळखू लागले. मात्र नुकत्याच सोशल मिडियावरिल एका लाईव्ह चॅट दरम्यान शेहनाजने हे टायटल नाकारलं

मुंबई- 'बिग बॉस १३' हा शो गाजण्यामागे महत्वाची भूमिका जर कोणी पार पडली असेल तर ती म्हणजे पंजाबची अभिनेत्री शेहनाज गिल हिने. शेहनाजच्या नौटंकीपणामुळे आणि मनोरंजनामुळे ती चांगलीच हिट झाली होती. त्यामुळे हा सिझन देखील गाजला होता. शेहनाज गिल केवळ टॉप ५ स्पर्धकांमध्ये नव्हती तर तिने संपूर्ण शो मध्ये मनोरंजन करुन प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. सलमानने शेहनाजला पंजाबची कतरिना कैफ म्हटल्यावर चाहते तिला या नावाने ओळखू लागले. मात्र नुकत्याच सोशल मिडियावरिल एका लाईव्ह चॅट दरम्यान शेहनाजने हे टायटल नाकारलं आणि सांगितलं की ती आता पंजाबची कतरिना कैफ नाही आहे. 

हे ही वाचा: हिमांशी खुरानाने तिच्या चाहत्याच्या मृत्युवर व्यक्त केलं दुःख..

शेहनाज गिलने सोशल मिडियावर एका लाईव्ह चॅट दरम्यान असं सांगितलं की, ती आता पंजाबची कतरिना कैफ नाही आहे मात्र ती आता भारताची शेहनाज गिल आहे. शेहनाजने बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये एंट्री केली होती तेव्हा सलमान खानला स्वतःची ओळख करुन देताना ती सगळ्यांसमोर म्हणाली होती की, मी पंजाबची कतरिना कैफ आहे.

शेहनाजच्या मनमिळावू स्वभावामुळे ती घरात एकदम कूल स्पर्धक म्हणून वावरताना दिसली. तिचा चुलबुली गर्लचा अंदाज, बालिश हरकती प्रेक्षकांना आवडू लागल्या आणि ती घरातल्यांची नाही तर चाहत्यांची आवडती स्पर्धक बनली. बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही शेहनाजच्या मजेशीर स्वभावाचं कौतुक वाटायचं. या शोमुळे शेहनाजच्या सोशल मिडियावरील फॅन फॉलोईंगमध्ये चांगलीच वाढ झाली.

शेहनाज आजही सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मिडियावर ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत अपडेटही देत असते. शेहनाज एका उत्तम प्रोजेक्टच्या शोधात आहे. याव्यतिरिक्त बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयारी देखील करतेय. बिग बॉसच्या शो नंतर  सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाच्या गाण्याने अनेक रेकॉर्ड देखील तोडले होते. 

shahnaaz gill no longer considers herself as katrina kaif of punjab


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shahnaaz gill no longer considers herself as katrina kaif of punjab