लेकीसाठी फोटोग्राफर बनली गौरी खान, सुहानाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

suhana
suhana
Updated on

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना बॉलिवूडकर सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. सगळे सेलिब्रेटी आणि त्यांची मुलं लॉकडाऊनमध्ये घरीच आहेत. हे सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहेत. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान चित्रपटसृष्टीत काम करत नसली तरीही ती कोणत्याही सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही आहे. तिचे फोटोज् आणि व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. याशिवाय ती सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव देखील असते. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटोज् व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे सुहानाचे हे फोटो तिची आई गौरी खानने काढले आहेत. गौरी तिच्या मुलीसाठी फोटोग्राफर बनली आहे.  

यामध्ये फोटोजमध्ये सुहानाने अजिबात मेकअप केलेला नाही असे सांगण्यात आले आहे. पण तिचे हे फोटो जर झूम करून पाहिले तर तिने तिच्या ओठांवर लिपस्टीक आणि गालांवर ब्लश देखील लावलेलं दिसून येत आहे. परंतु गौरीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करून सुहानाने फोटोमध्ये मेकअप केलेला नाही असे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे फोटो सुहानाचा नो मेकअप लूक म्हणून व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

my mum took these @gaurikhan

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

गौरीने सुहानाचे हे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावर गौरीने कॅप्शन लिहिले आहे की, ' नो मेकअप, नो हेअर, माझी फोटोग्राफी...' सुहानाने देखील हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यावर तिने कॅप्शन लिहिले आहे की, ' माझ्या आईने हे फोटोज् काढले आहेत.'गौरीने सुहानाचे हे फोटोज् त्याच्या घरातच काढले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No hair !!!!! No make up !!!! Just my photography!!!!

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

सुहाना तिच्या या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिने यामध्ये जीन्सवर ट्यूब टॉप घातले आहे. आणि त्यावर गळ्यात एक छोटं नाजूकसं पेंडेन्ट घातले आहे.  याशिवाय सुहानाच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे. सुहाना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते.

तिने कोणताही फोटो शेअर केल्यावर तो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होतो. सुहानाचे इंस्टाग्राम अकाऊंट बरेच वर्षे प्रायव्हेट होते. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यावर तिने तिचं इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे. त्यामुळे तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

shahrukh khan daughter suhana photo shoot with mom gauri

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com