
Pathaan: कोणी म्हणतंय ७०० तर कुणी ८०० कोटी..शाहरुखनं अखेर सांगितली 'पठाण'ची खरी कमाई..आकडा ऐकून चाहते हैराण
Pathaan: 'पठाण'ला मिळालेल्या यशानं हे तर सिद्ध केलं आहे की अजूनही बॉलीवूडचा किंग एकच तो म्हणजे शाहरुख खान. सध्या शाहरुखचीच हवा सगळीकडे आहे. ४ वर्षानंतर अभिनेत्यानं मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्याचे चाहते त्याची चातकासारखी वाट पाहत होते.
प्रेक्षकांनीही त्याच्या सिनेमाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आपल्या बादशहाचं दमदार स्वागत केलं. 'पठाण'ने कमाईचा असा डोंगर उभा केला आहे की त्यामुळे बॉलीवूडचे जुने जुने रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.शाहरुखच्या यशात त्याच्या सोशल मीडियावरील चाहत्यांचा देखील मोठा हात आहे.
'पठाण' च्या प्रमोशनसाठी शाहरुखनं शहरा-शहरात जाऊन इव्हेंट अटेंड करायची जुनी पद्धत मुळीच अवलंबली नाही. तर सोशल मीडियावर शाहरुखनं सिनेमा रिलीज होण्याआधी नेटकऱ्यांशी खूप संवाद साधला.
सिनेमानं रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतरही शाहरखनं चाहत्यांसोबत ऑनलाइन इंटरॅक्शन केलं. #AskSRK सेशन च्या माध्यमातून त्यानं ट्वीटरवर चाहत्यांच्या नको-नको त्या प्रश्नानांना मजेदार अंदाजात उत्तरं दिली. आणि याचा 'पठाण'च्या सक्सेसमध्ये खूप फायदा झाला असं म्हटलं तर नक्कीच चूकीचं ठरणार नाही.
एका फिमेल यूजरनं शाहरुखला ट्वीट करत लिहिलं की,'लग्नाची मागणी तर नाही घालणार पण माझ्यासोबत वॅलेंटाईन डेटला येशील का? असं नक्कीच विचारण्यास इच्छुक आहे'. यावर शाहरुखनं खूप प्रेमानं उत्तर देत लिहिलं कूी,''मी डेटवर खूपच बोरिंग वागतो..कोणत्यातरी कूल मुलासोबत जा आणि थिएटरमध्ये पठाण नक्की पहा''.
एका युजरनं तर शाहरुखला चक्क माझ्या स्वप्नात येणं बंद कर असा क्यूट दम भरला. याला उत्तर देताना किंग खान म्हणाला,''तू झोपणं बंद कर..मग नाही येणार तुझ्या स्वप्नात''.
आणखी एका यूजरनं AskSRK सेशन अंतर्गत ट्वीट करत लिहिलं की,''त्याला 'पठाण'चा सेकंड हाफ आवडला नाही. तेव्हा शाहरुखनं हजरजबाबीपणानं उत्तर दिलं की,'' पठाण चा फर्स्ट हाफ आवडला ना,तर तो पहा आणि सेकंड हाफ ओटीटीवर कुठल्या तरी दुसऱ्या सिनेमाचा पहा या वीकेंडला''.
१० दिवसात बॉक्सऑफिसवर पठाणनं जवळपास ७२५ करोडचं वर्ल्ड वाइड कलेक्शन केलं पण 'पठाण'च्या कमाईवर अनेकांचा विश्वास बसत नाही.
यासंबंधित प्रश्न विचारताना एक युजर म्हणाला,''पठाणचं रिअल कलेक्शन किती आहे?'' याचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला,''५००० करोड लव्ह. ३००० करोड गूड कमेंट्स आणि ३२५० करोड हग्स...२ बिलियन स्माइल.. आणि याच्यात कमाईचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. तुझे आकडे काय सांगतायत?''