Sunny Leone: मणिपूरमध्ये फॅशन शो व्हेन्यूजवळ मोठा धमाका..सनी लियोनी थोडक्यात बचावली Sunny Leone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunny Leone

Sunny Leone: मणिपूरमध्ये फॅशन शो व्हेन्यूजवळ मोठा धमाका..सनी लियोनी थोडक्यात बचावली

Sunny Leone: मणिपूर मधील इम्फाल येथे एका फॅशन शो व्हेन्यू जवळ मोठा धमाका झाल्याचं समोर आलं आहे. या फॅशन शो मध्ये सनी लियोनी भाग घेणार होती. फॅशन शो संबंधित एका अधिकाऱ्यानं याविषयी माहिती दिली आहे.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं कळत आहे. हा धमाका मणिपूरच्या हट्टा कांगजीबंग परिसरात झाला आहे. व्हेन्यू या दूर्घटनाग्रस्त ठिकाणाहून जवळपास १०० मीटर अंतरावर होता. शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता हा धमाका झाला आहे.

अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, हा स्फोट एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसमुळे की ग्रेनाइडमुळे झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.

स्फोट जिथे झाला आहे तिथून काहीच अंतरावर फॅशन शोसाठी स्टेज बांधण्यात आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेतली आहेत. पोलिसांच्या एका टीमनं तेथील आसपासच्या ठीकाणांचे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. अद्याप यासाठी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

सनी लियोनी रविवारी म्हणजे उद्या ५ फेब्रुवारी रोजी या फॅशन शो मध्ये शो स्टॉपर म्हणून भाग घेणार होती. ती मणिपूरमध्ये जाऊन खादी आणि हॅंडलूम सारख्या प्रॉडक्ट्सना प्रमोट करणार होती.

या शो ची टॅगलाइनच होती.. Couture Festive Season Fall Winter Collection 2023. सनी लियोनी भाग घेणार म्हणून या शोची खूप चर्चा होती आणि शो ची तिकीट विक्री देखील मोठ्या प्रमाणात झाली होती.