esakal | पप्पांशी बोलायचं त्यासाठी लागते अपॉइंटमेंट, आर्यनचा एनसीबीकडे खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

पप्पांशी बोलायचं त्यासाठी लागते अपॉइंटमेंट, आर्यनचा एनसीबीकडे खुलासा

पप्पांशी बोलायचं त्यासाठी लागते अपॉइंटमेंट, आर्यनचा एनसीबीकडे खुलासा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीनं अटक केली आहे. त्याला सात ऑक्टोबरपर्यत कोठडीत ठेवण्याचा आदेशही दिला आहे. आर्यनसह आणखी काही जणांची एनसीबीची चौकशी करण्यात आली आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे. यापूर्वी आर्यनसह अटकेत असलेल्या नूपुर सारिकानं सॅनिटरी पॅडमधून ड्रग्ज लपवून क्रुझनर नेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आणखी या प्रकरणात हाती आणखी काय लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दुसरीकडे आर्यन खाननं दिलेल्या माहितीमुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. काल त्याला न्यायालयानं कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला जामीन मिळावा म्हणून त्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वीच्या ड्रग्जच्या वेगवेगळ्या केसेसचा दाखला दिला होता.

मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या त्या कॉर्टिलिया नावाच्या क्रुझमध्ये एनसीबीनं छापा टाकला होता. त्यात त्यांनी अनेकांना अटक केली आहे. मात्र यासगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरुखच्या मुलाची. आता आर्यनला सात ऑक्टोबरपर्यत कोठडी मिळाली आहे. आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे क्रुझवर पार्टी करण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्याआधारे पोलिसांनीही आता चौकशीला सुरुवात केली आहे. जेव्हापासून एनसीबीला रिमांड मिळाला आहे तेव्हापासून त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या चौकशी दरम्यान आर्यननं केलेला खुलासा हा धक्कादायक आहे. त्यानं सांगितलं की, पपांशी बोलायचं तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तो खुलासा आश्चर्यकारक असल्याची चर्चा आहे.

आर्यनची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. आर्यननं अधिकाऱ्यांना सांगितलं की, माझे बाबा हे फार व्यस्त असतात. त्यांनी कित्येकदा मलाही भेटायचं असेल तर मॅनेजरकडे अपॉइंटमेंट घे असे सांगितलं होतं. आर्यननं एनसीबीला हेही सांगितलं की, त्यानं परदेशातून फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे. शाहरुख हा नेहमी त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. सध्या तो त्याच्या पठाण चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र दरम्यान आर्यनचं प्रकरण समोर आल्यानं त्याला ते अर्धवट सोडावं लागलं आहे.

हेही वाचा: आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी; पाहा व्हिडिओ

हेही वाचा: हे बरंय! आर्यन खानचे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढतायेत लाखांनी

loading image
go to top