शैलेश लोढाने घेतला 'तारक मेहता'चा निरोप, निर्मात्याने स्पष्टच सांगितले

शैलेश लोढाने घेतला 'तारक मेहता'चा निरोप
Sailesh Lodha
Sailesh LodhaInstagram

गेल्या काही दिवसांमध्ये बातम्या आल्या होत्या की 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodhe) यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान जूनमध्ये शैलेशचा नवीन शो 'वाह भाई वाह' चा प्रोमोही आला. मात्र शैलेश किंवा निर्मात्यांच्या वतीने मालिका सोडण्याच्या वृत्तांनुसार कोणतीही प्रतिक्रिया आल्या नाहीत. यामुळे चाहते गोंधळेले होते की शेवटी काय चालले आहे. नव्या वृत्तानुसार शैलेश आता शोमध्ये तारक मेहताच्या भूमिकेत दिसणार नाही. मात्र एपिसोडच्या शेवटी येणाऱ्या आपल्या मोनोलाॅगसाठी ते आजही चित्रीकरण करत आहेत. (Shailesh Lodha Exit From Taarak Mehta Show Producers Tell Reason)

Sailesh Lodha
Paithani Saree : पैठणीच्या प्रेमात वेड्या असलेल्या अभिनेत्री

निर्मात्याबरोबर झालेला करार हे कारण

शैलेश यांच्या निर्णयामागे निर्माता असित मोदी यांचा एक करार आहे. करारानुसार 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या अभिनेते जोपर्यंत शो करतात तोपर्यंत दुसरीकडे काम करु शकत नाही. भले त्यांना १७ दिवस काम नसेल ही. यामुळेच अनेक अभिनेते शोवर खूश नाहीत. तारक मेहताच्या भूमिकेसाठी शैलेश लोढा यांना १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस द्यावे लागत होते. त्यामुळे बाकी वेळ ते आपल्या कविता असणाऱ्या शोसाठी देऊ इच्छित होते. तारक मेहताचे निर्माते असित मोदी म्हणाले, की त्यांची ही विनंती स्वीकारु शकत नाही. कारण पुन्हा इतर अभिनेत्यांसाठी करारातील नियम बदलावे लागतील. वृत्तात पुढे म्हटले आहे, की या करारामुळे आता अनेक अभिनेत्यांसाठी अडचण ठरत आहे. शोच्या नंतर उरलेल्या वेळेत काय करायचे? (Entertainment News)

Sailesh Lodha
The Archies Teaser: सुहाना खान,खुशी कपूर,अगस्त्य नंदा;'द आर्चिज' फर्स्ट लूक

राज अनादकटनेही शो सोडला

वृत्तात म्हटले आहे, की टप्पूची भूमिका करणाऱ्या राजक अनादकटनेही याच कारणामुळे शो सोडला आहे. त्यानेही तारक मेहता का उलटा चष्मा व्यतिरिक्त दुसऱ्या प्रोजेक्ट्स करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र त्याची मागणीही नाकारली गेली. त्यामुळेच आता एक संगीत व्हिडिओ तो करत आहे. कदाचित राज लवकरच चित्रपटांमध्ये दिसेल. तो 'तारक मेहता'तून बाहेर पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com