The Archies Teaser: सुहाना खान,खुशी कपूर,अगस्त्य नंदा,'द आर्चिज' फर्स्ट लूक Zoya Akhtar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Archies Teaser out

The Archies Teaser: सुहाना खान,खुशी कपूर,अगस्त्य नंदा;'द आर्चिज' फर्स्ट लूक

झोया अख्तरचा आगामी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा 'द आर्चिज' सिनेमाचा टिझर आणि पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमातील सुहाना खान(Suhana Khan),खुशी कपूर(Khushi Kapoor),अगस्त्य नंदा यांच्यासोबत इतर स्टार किड्सचा देखील लूक रिवील केला आहे. झोया अख्तर या सिनेमाच्या माध्यमातून 'आर्चिज' या कॉमिक्समधील प्रसिद्ध कॅरॅक्टर आता स्क्रीनवर घेऊन येत आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना 'वेरोनिका',दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी 'बेट्टी' तर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य 'आर्चिज'ची भूमिका साकारत आहे.

झोया अख्तरने सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करीत लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होईल असं पोस्टच्या माध्यमातून जाहिर केलं आहे. सुहाना,खुशी आणि अगस्त्य या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. हा सिनेमा प्रसिद्ध कॉमिक्स बुक 'आर्चिज' वर आधारित आहे. ज्याला पाहिल्यानंतर आपल्या पैकी अनेकजण गतकाळातल्या चांगल्या आठवणीत रमेल एवढं निश्चित. सिनेमात वेरोनिका,बेट्टी,Jugheadआणि रेग्गी ची गोष्ट पहायला मिळेल.

हेही वाचा: वयाच्या ७४ व्या वर्षी मुमताजचा त्यांच्या विवाहबाह्य संबंधाविषयी मोठा खुलासा

सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं तर जरी हे स्टार किड्स असले तरी सिनेमातील ते सगळे फ्रेश चेहरे आहेत. कारण त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सुहाना,खुशी,अगस्त्य व्यतिरिक्त मिहिर अहूजा,डॉट,वेदांग रैना आणि युवराज मेंडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: धर्मवीरचा 'आनंद' भिडला गगनाला, पहिल्याच दिवशी 2 कोटींची कमाई

सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर बॉलीवूडकरांनी या नव्या दमाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. सुहाना खानच्या बेस्ट फ्रेंड्स असलेल्या शनाया कपूर आणि अनन्या पांडे यांनी देखील आपल्या मैत्रिणीला भरुभरुन प्रेम देत तिचं अभिनंदनही केलं आहे. टीझर पाहिल्यावंर सुहाना,खुशी आणि अगस्त्य यांच्यातील आत्मविश्वास मात्र चांगलाच दिसत आहे. आता प्रतिक्षा राहिल ती त्यांच्या अभिनयकलेच्या सादरीकरणाची.

Web Title: The Archies Teaserposter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top