अभिनेते शक्ती कपूर यांनी पायी प्रवास करणा-या मजुरांच्या वेदना केल्या कवितेततून व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

स्थलांतर मजुरांचे समोर येणारे फोटो पासून मन सुन्न होत आहे. याच मजुरांची ही परिस्थिती पाहून अभिनेते शक्ती कपूर यांनी गाण्यातून त्यांच्या वेदना जगसमोर मांडल्या आहेत.

मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातंच लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान मजुरांचे खूप हाल झाले आहेत. हाताला काम नसल्याने दोन वेळचं नीट न खायला मिळाल्याने हे मजूर पायी प्रवास करत त्यांचं गाव गाठत आहेत. संपूर्ण संसार आणि मुला बाळांसह हे लोक शेकडो मैल पायी तुडवत चालले आहेत. त्यात सूर्य आग आगतोय अशा परिस्थितीत या स्थलांतर मजुरांचे समोर येणारे फोटो पासून मन सुन्न होत आहे. याच मजुरांची ही परिस्थिती पाहून अभिनेते शक्ती कपूर यांनी गाण्यातून त्यांच्या वेदना जगसमोर मांडल्या आहेत.

हे ही वाचा : अशोक मामांनी मुंबई पोलिसांसाठी आखला खास आमरसपुरीचा बेत

अभिनेते शक्ती कपूर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी त्यांनी एक गाणं समर्पित केलं आहे. मुझे घर जाना है असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या माध्यमातून शक्ती कपूर यांनी त्यांच्या मनातील मजुरांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. 

हे गाणं गाताना शक्ती कपूर यांचा नवा लूक या गाण्याच्या दरम्यान दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये शक्ती कपूर यांचे केस आणि दाढी सफेद झालेले दिसून येत आहे. त्यांच्या या लूककडे पाहून लॉकडाऊनमध्ये त्यांना हेअरकट आणि शेविंग करायला मिळालं नसल्याचं दिसून येतंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I pray every one is safe and home ♥️

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor) on

या स्थलांतरित मजुरांना मदत करण्यासाठी बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. नुकतंच अभिनेता सोनू सूदने या मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती. तर सलमान खाननेही या मजुरांना पैशांची व्यवस्था केली होती.   

shakti kapoor expressed the pain of laborers through song  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shakti kapoor expressed the pain of laborers through song