Bigg Boss 16: टीनाला शालीनच्या रागाची वाटते भीती, म्हणते- "त्याने मला माझ्या..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shalin Bhanot and Tina Datta

Bigg Boss 16: टीनाला शालीनच्या रागाची वाटते भीती, म्हणते "त्याने मला माझ्या..."

बिग बॉसने टीव्ही इंडस्ट्रीला आत्तापर्यंत अनेक जोडपी दिली आहेत, ज्यांचे नाते घरातून सुरू झाले होते आणि ते आजपर्यंत कायम आहे. या सीझनमध्येही अशीच काही जोडपी पाहायला मिळाली. यामध्ये अंकित गुप्ता - प्रियांका चहर चौधरी, सौंदर्या शर्मा - गौतम विग आणि शालीन भानोत - टीना दत्ता यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

मात्र, आत्तापर्यंत टीनावर अनेकवेळा खोटे आरोप करण्यात आले आहेत कारण अभिनेत्री त्याच्यासोबत दिसते, पण तिला रिलेशनशिप ठेवायचे नाही. आता टीनाने शालीनसोबत रिलेशनशिपमध्ये न येण्यामागचे कारण सांगितले आहे.

हेही वाचा: Shakuntalam Hindi Trailer: शकुंतला बनून समंथाने लुटली चाहत्यांची मने

बिग बॉस 16 च्या नवीनतम भागामध्ये, टीना दत्ता तिच्या पूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वृत्तीबद्दल बोलते. अभिनेत्री म्हणाली की शालीन भानोत तिला तिच्या अपमानास्पद एक्स बॉयफ्रेंड आणि पाच वर्षांच्या हिंसक रिलेशनशिपची आठवण करून देते. बागेच्या परिसरात श्रीजीता आणि प्रियंका यांच्याशी गप्पा मारत असताना, टीना शालीनच्या स्वभावाबद्दल बोलते आणि सांगते की तिचे पूर्वी अशा एका पुरुषाशी रिलेशनशिप होते, जिथे तिला खूप भांडण आणि नाटकाला सामोरे जावे लागले होते.

नंतर शोमध्ये शालीन आणि टीना एकमेकांशी संवाद साधतानाही दिसले. दोघांनीही आपल्या नात्याबद्दलचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. शालीनने टीनाला विचारले की तिने त्याच्यावर कधी प्रेम केले आहे का? यावर टीना म्हणाली, "हो काही प्रमाणात मला तुझ्याबद्दल भावना आहेत, पण कॅमेराच्या बाहेर तू खूप हुशार गोष्टी बोललास. प्रत्येक वेळी तू सर्व दोष माझ्यावर टाकतोस." शालीनने तिचे स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की तिने नेहमीच त्याच्यासाठी भूमिका घेतली आहे आणि लवकरच दोघांमधील संभाषणाचे रूपांतर वादात होते.