
संपलं! राकेश बापट सोबत ब्रेकअप झाल्याची शमितानेच केली घोषणा, म्हणाली..
shamita shetty break up : अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. पण त्यावेळी मात्र दोघांनीही या गोष्टीला नकार दिला होता. पण अवघे काही महीने उलटलेले असतानाच शमिता आणि राकेशच्या ब्रेकअपची पुन्हा चर्चा सुरू झाली. अखेर शमिता शेट्टीने तिचा राकेश बापट सोबत ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे नाते बिग बॉस या हिंदी शो मुळे बरेच चर्चेत आले. त्या शो दरम्यान शमिता आणि राकेश एकत्र आले होते. पुढे त्यांच्या लवस्टोरिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. पण आता त्यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा स्वतः शमिताने केला आहे. शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप झालं असून याबद्दल अधिकृत घोषणा शमिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केली आहे.
सध्या शमिता आणि राकेश यांचे बरेच फोटो व्हायरल (shamita shetty and raqesh bapat photo viral) होताना दिसत आहेत. पण हे फोटो त्यांच्या एका म्युजिक व्हिडिओचे असून याची माहिती शमिताने दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते, 'मला असं वाटतं हे स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. मी आणि राकेश आता एकत्र नाही आहोत आणि बरेच दिवसांपासून नव्हतो. पण हा सुंदर म्युजिक व्हिडिओ आमच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं आणि आशीर्वाद दिले. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमच्यावर असलेलं प्रेम असंच ठेवा. इथून पुढील वाटचालीसाठी साकारात्मकतेची अपेक्षा ठेऊया. सगळ्यांना भरपूर प्रेम आणि कृतज्ञता.'

राकेशने सुद्धा याबाबत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत स्पष्टता दिली आहे, 'मी या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही आहोत. नियतीने चुकीच्या वेळी आम्हाला एकत्र आणायचं ठरवलं. आमच्यावर भरभरून प्रेम केलेल्या ‘शरा’ फॅमिली आणि फॅन्सचे खूप आभार. मला या ब्रेकअपबद्दल फारशी वाचत्या करायची नव्हती. पण आमच्या चाहत्यांचा विचार करून मी ही घोषणा करायचं ठरवलं. मला कल्पना आहे की याने तुम्हाला दुःख होईल आणि वाईट वाटेल पण आशा करतो की आम्हा दोघांवर तुम्ही असंच प्रेम कायम करत राहाल. हा म्युजिक व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आहे.”
Web Title: Shamita Shetty And Raqesh Bapat Announce Break Up Shamita Said We Are No Longer Together
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..