अभिनेता शरद केळकरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील फोटोची पुन्हा होतेय चर्चा

sharad
sharad

मुंबई- अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या सिनेमाचं ज्याप्रमाणे प्रमोशन करण्यात आलं होतं त्या हिशोबाने प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद याला मिळाला नाही. अक्षय कुमारच्या अभिनयाबाबत अनेकांचं दुमत होतं. मात्र या सिनेमात जर कोणाची खूप स्तुती झाली असेल तर ती म्हणजे अभिनेता शरद केळकरची. या सिनेमात खऱ्या लक्ष्मीची भूमिका अभिनेता शरद केळकरने साकारली होती. त्याची ‘लक्ष्मी’ प्रेक्षकांच्या मनात चांगलीच भरली. तशीच याआधी शरदने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. शरदने नुकतीच एक पोस्ट केली आहे ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

अभिनेता शरद केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. हा फोटो शेअर करत शरदने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय.

शरदने हा फोटो पोस्ट करत लिहिलंय,  ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान काही निराळाच होता’. एकीकडे त्याची लक्ष्मी ही ट्रान्सजेंडरची भूमिका तर दुसरीकडे त्याचा छत्रपती शिवाजी महाराच यांच्या भूमिकेतील लूक. या दोन्ही एकदम हटके आणि वेगळ्या भूमिकेसाठी त्याचं कौतुक होतंय.

शरदने दिलेल्या कॅप्शनवरुन हा फोटो ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक होता. शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भरगोस कमाई केली होती.

sharad kelkar post on chatrapati shivaji maharaj  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com