
'नागिन ५' मालिकेचं शूटींग करत असलेल्या अभिनेता शरद मल्होत्रा कोविड-१९ पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर मालिकेच्या शूटींगला ब्रेक लागला आहे.
मुंबई- कोरोना व्हायरसच्या संकटातंही सिनेमा आणि टीव्ही मालिकांचं शूटींग सुरु आहे. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत आणि बरे होऊन पुन्हा एकदा कामावर देखील रुजु झाले आहेत. याच साखळीत आता आणखी एक नाव जोडलं जातंय ते म्हणजे टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राचं. 'नागिन ५' मालिकेचं शूटींग करत असलेल्या अभिनेता शरद मल्होत्रा कोविड-१९ पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर मालिकेच्या शूटींगला ब्रेक लागला आहे.
हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांना आराध्याने सांगितला होता कोरोनाचा खरा अर्थ
दिग्दर्शक राजन शाही यांनी शरद मल्होत्राला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलं की 'शुक्रवारी दुपारी शरद मल्होत्राला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. जशी ही बातमी आमच्या पर्यंत पोहोचली आम्ही लगेचच ही शूटींग थांबवली. टीमच्या सगळ्या सदस्यांची कोरोना टेस्ट केली गेली. याचे रिपोर्ट दुस-या दिवशी येतील.
सध्या 'नागिन ५' या मालिकेचं शूटींग तीन दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे. पुढचं शूट इतर सदस्यांचे कोरोना रिपोर्ट आल्यानंतर सुरु केलं जाईल. सध्या अभिनेता शरद होम क्वारंटाईन आहे.'
अभिनेता शरदची को स्टार सुरभी चंदना हिने देखील पोस्ट केली आहे. तिने इंस्टाग्रामवर शरदसोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय, 'माझ्यासाठी एवढी काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. जसा माझ्या टेस्टचा रिझल्ट येईल मी तुम्हाला अपडेट करेन.'शरद मल्होत्रा सध्या 'नागिन ५' या मालिकेत दिसून येत आहे. चाहत्यांना शरदचा अभिनय चांगलाच पसंत पडतोय. शरदला 'बनू मै तेरी दुल्हन' या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली होती.
sharad malhotra corona positive naagin 5 shoot stops