Sharad Ponkshe: ब्राह्मण द्वेश जेवढा करता येईल तेवढा करा.. शरद पोंक्षे यांचं खुलं आव्हान..

शरद पोंक्षे यांची संतप्त कमेंट, ठरतेय चर्चेचा विषय..
Sharad Ponkshe comment on own post about casteism and brahmin community
Sharad Ponkshe comment on own post about casteism and brahmin communitysakal

Sharad Ponkshe: अभिनयासोबतच आपल्या विचारांनी हिंदूंना संबोधित करणारे, सावरकरांची विचारधारा जपणारे अभिनेते शरद पोंक्षेत्यांच्या विधानाने कायमच चर्चेत असतात.

त्यांची विचारधारा आणि राजकीय मते स्पष्ट असल्याने त्यांच्याविषयी अनेक मत मतांतरे आहेत. शरद पोंक्षे व्याख्याने आणि चर्चासत्रे या माध्यमातून सावरकरांचे विचार जनमानसात पोहोचवत आहेत.

ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. याशिवाय ते जाती संपवून एकत्र या असे आवाहनही करत असतात. पण बऱ्याचदा त्यांना त्यांच्या जातीवरून बोलले जाते, त्यांच्यावर टीका केली जाते. त्यामुळे आज शरद पोंक्षे या मुद्द्यावर चांगलेच भडकले आहेत.


(Sharad Ponkshe comment on own post about casteism and brahmin community)

Sharad Ponkshe comment on own post about casteism and brahmin community
Samir Choughule: 'ते' स्किट भोवलं.. हास्यजत्रा फेम समीर चौगुलेवर आली माफी मागायची वेळ..

शरद पोंक्षे यांनी शिवराज्यभिषेक दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो शेयर करत 'छ.शिवाजी महाराजांना मानवंदना.असे राजे पुन्हा होणे नाही...' अशी एक पोस्ट शेयर केली होती.

या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूपच चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्यांची जात काढून त्यावरही टीका केल्या. तसे या पोस्ट मध्ये जाती द्वेषाने कमेंट करण्यासारखे काहीच नव्हते, तरीही नेटकाऱ्यांनी याला जातीय वळण दिल्याने शरद पोंक्षे चांगलेच संतापले आहेत.

sharad ponkshe latest news
sharad ponkshe latest news sakal
Sharad Ponkshe comment on own post about casteism and brahmin community
Vaibhav Mangale Birthday: ज्याला अख्खी इंडस्ट्री घाबरते, असा वैभव मांगले ती गोष्ट दिसताच भीतीने काढतो पळ..

या पोस्ट वर शरद पोंक्षे  (sharad ponkshe)  यांनी एक संतप्त कमेंट केली आहे. ते लिहितात की, ''कमाल वाटते.जातीद्वेश ईतका रूजलाय की माझ्या ह्या पोस्टवर पण जातीद्वेशातून प्रतिक्रिया आल्या. बुध्दीची कीव येते अशांची.''

''जातीद्वेश त्यात ब्राह्मण द्वेश ईतका भरलाय किंवा तो जाणिवपुर्वक भरवला गेलाय की विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसवतच नाही.करा जाती द्वेश ब्राह्मण द्वेश जेवढा करता येईल तेवढा करा.”० “ फरक पडतो .फक्त ईथे असं लिहीतील असं वाटलं नव्हतं म्हणून व्यक्त झालो बास. चलने दो…'' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com