Sharad Ponkshe: सहावीत शिकणारा मुलगा काल हे विचार घेऊन.. शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

अभिनेते शरद पोंक्षे यांनी शेयर केलेली एक पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे.
Sharad Ponkshe shared post about his lecture in school and one of small child inspire from sawatantryaveer savarkar thoughts
Sharad Ponkshe shared post about his lecture in school and one of small child inspire from sawatantryaveer savarkar thoughtssakal

Sharad Ponkshe : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.

इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे.

शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. असेच एक व्याख्यान देण्यासाठी ते एका शाळेत गेले होते. तो अनुभव त्यांनी पोस्ट मधून शेयर केला आहे.

(Sharad Ponkshe shared post about his lecture in school and one of small child inspire from sawatantryaveer savarkar thoughts)

Sharad Ponkshe shared post about his lecture in school and one of small child inspire from sawatantryaveer savarkar thoughts
Emraan Hashmi Birthday: 'मर्डर' मधले किसिंग सीन पाहून 'ती'नं इमरानला अक्षरशः नखांनी ओरबाडलं..

शरद पोंक्षे व्याख्यान देण्यासाठी सुविद्य विद्यालयामध्ये गेले होते. यावेळी पोंक्षे यांनी शाळकरी मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान दिलं. या मुलांबरोबर फोटो शेअर करत त्यांनी एक अनुभव सांगितला. शरद यांचं व्याख्यान ऐकून झाल्यानंतर इयत्ता सहावीमधल्या मुलाची नेमकी काय प्रतिक्रिया होती याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

या पोस्ट मध्ये पोंक्षे म्हणाले आहेत, ''परवा सुविद्य विद्यालयात मुलांसमोर सावरकर समजावून सांगताना.ते व्याख्यान संपलं. व त्यानंतर ज्यांनी ही व्याख्यानं आयोजीत केली ते पराग कूलकर्णी ह्याचा मुलगा ते ऐकायला आला होता.त्याने पाठवलेली प्रतिक्रिया खाली देतोय.''

ती प्रतिक्रिया अशी की, “काल माझ्या मुलाला त्याच्या आई नी विचारल कसा वाटला कार्यक्रम ? त्यानी क्षणात उत्तर दिल… “मला रामायण , कॄष्ण आणि शिवाजी वाचायचा आहे . “ आई नी विचारल शरदजीन सोबत फोटो का काढला नाहीस. अर्जुननी उत्तर दिल “मी त्यांचं निरीक्षण करत होतो. इतकी गर्दी होती त्यांच्या भोवती तरीही ते किती नम्र आणि शांत होते.”

''६ वीतला मुलगा काल हे विचार घेवून घरी आला . हे तुमच्या वाणीच , विचारांच आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाच फलित आहे . असा परिणाम काल च्या मुलां वर आणि पालकानं वर झाला असेल ह्यात शंकाच नाही .तुमको हमारी उमर लग जाए !हा देश भक्तीच्या विचारांचा वणवा मैलोन मैल पसरवायचा आहे... आपला पराग कूलकर्णी.'' अशा शब्दात पोंक्षे यांनी देशभक्ती मुलांपर्यंत अशी पोहोचते आहे, हे त्यांच्या पोस्टमधून दाखवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com