
Sharad Ponkshe: मला मुस्लिमांची भीती वाटत नाही.. शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत..
sharad ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.
इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. त्याच विषयावर आधारित एक खळबळजनक पोस्ट त्यांनी केले आहे.
(Sharad Ponkshe shared post and said i am not fear muslims i fear hindus swanatryaveer savarkar thoughts)
शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. ते सतत आपल्या व्याख्यानतून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत असतात.
आज त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे. या पोस्ट मध्ये पोंक्षे यांनी फोटो शेयर केला आहे. त्यात एक पोस्टर आहे, ज्यात लिहिलं आहे की, “मला मुसलमानांची भीती वाटत नाही.. इंग्रजांची भिती वाटत नाही.. हिंदूंचीच भिती वाटते. हिंदूनीच आज हिंदूत्वाशी वैर सुरू केले आहे.'' त्यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.