
Sharad Ponkshe: त्यांनी वंदे मातरमचा मुडदा पडला.. शरद पोंक्षे यांची काँग्रेसवर जहरी टीका..
Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे सध्या अंदमान दौऱ्यावर गेले आहेत. सावरकरांचे विचार आणि त्यांचे राष्ट्रकार्यतील संघर्ष पोहोचवण्यासाठी शरद पोंक्षे दिवसरात्र मेहनत करत आहेत. या विषयावर ते राज्यभरात जाऊन व्याख्यान देत सावरकर विचार आणि हिंदुत्वाचा जागर करत आहे.
याच त्यांच्या विचार कार्यातील एक भाग म्हणजे अंदमान यात्रा. काही तरुणांना घेऊन पोंक्षे साध्या अंदमान येथे गेले आहेत. या ठिकाणी ते तरुणांना इतिहास उलगडून सांगत आहेत. या शिवाय सावरकरांचे कार्य, त्यांनी भोगलेल्या यातना यावर यावर पोंक्षे मुलांमध्ये जागृती करत आहेत.
याच दौऱ्यातला एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये पोंक्षे यांनी स्वातंत्र्य चळवळीतला दाखला देत राष्ट्रीय कॉँग्रेसवर घणाघात केला आहे.
(Sharad Ponkshe shared video about vande mataram independence movement slams national congress and muslim community )
शरद पोंक्षे हे हिंदुत्ववादी विचारधारेचे आहेत. त्यामुळे त्यांनी कायमच गांधी आणि कॉँग्रेस पक्षावर टीका केली. किंबहुना आजही ते कॉँग्रेस पक्षाच्या धोरणावर टीका करत असतात. अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी पोंक्षे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या व्हिडिओ मध्ये पोंक्षे तरुणांना सांगत आहेत की, '' राष्ट्रीय कॉँग्रेसने जो काही हिन्दी राष्ट्रवाद स्वीकारला होता. त्या राष्ट्रवादातून त्यांनी मुसलमानांचं लांगूलचालन केलं. आणि ते लांगूलचालन इतक्या परकोटीला गेलं की, मुसलमानांनी स्वातंत्र्य चळवळीत यावं म्हणून त्यांनी हाजीहाजी केली.''
''ते येत नसतानाही त्यांनी येण्याचा हट्ट केला आणि त्यांच्या म्हणेल त्या मागण्या मान्य केल्या. आणि यामुळे कुणाचा जीव गेला, कुणाचा मुडदा पडला.. तो वंदे मातरमचा..''
अशी जहरी टीका पोंक्षे यांनी केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ साध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी ही ऐतिहासिक गोष्ट सांगितली त्याबद्दल पोंक्षे यांचं कौतुक केलं आहे.
शरद पोंक्षे यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. अभिनया सोबतच हिंदुत्व आणि सावरकर या विषयावर राज्यभरात व्याख्यान देत असतात. त्यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी आहेत.