Sharad Ponkshe: मला जर कुणी विचारलं तुझी जात कोणती? तर.. शरद पोंक्षे यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल..

शरद पोंक्षे यावेळी थेट आणि स्पष्टच बोलले..
Sharad Ponkshe shared video post about swatantryaveer savarkar ultimate goal and said humanity is my religion
Sharad Ponkshe shared video post about swatantryaveer savarkar ultimate goal and said humanity is my religionsakal

Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. अभिनया सोबतच हिंदुत्व आणि सावरकर या विषयावर राज्यभरात व्याख्यान देत असतात. त्यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी आहेत.

किंबहुना सावरकर आणि शरद पोंक्षे हे एक समीकरणच आहे. नुकतेच ते भाजप आणि शिंदे गट शिवसेना आयोजित सावरकर गौरव यात्रेतही सहभागी झाले होते. ते स्वतः शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत.

पोंक्षे आपल्या भाषणाने कायमच सर्वांना प्रभावित करत असतात, असाच एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

(Sharad Ponkshe shared video post about swatantryaveer savarkar ultimate goal and said humanity is my religion)

हे भाषण पोंक्षे यांच्या ''हे राम नथुराम'' या नाटकाच्या एका सोहळ्यातील आहे, असे दिसते. मागे तुरुंगाचा सेटही दिसत आहे. पोंक्षे यांनी या भाषणात सावरकरांचे ध्येय काय याविषयी भाष्य केले आहे.

पोंक्षे म्हणतात, ''सावरकरांना एकदा विचारलं होतं.. मग तुमचं अंतिम ध्येय नेमकं काय? त्यावर सावरकर म्हणाले, जर मला उद्या कुणी विचारलं तुझी जात काय तर मला असं सांगायला गर्व वाटेल की मनुष्य ही माझी जात.. जर उद्या मला कुणी विचारलं तुझा धर्म काय.. तर मला असं सांगायला आनंद वाटेल की माणुसकी हा माझा धर्म आहे.. आणि जर मला विचारलं तुझा देश काय तर मला सांगायला आनंद वाटेल की, पृथ्वी हा माझा देश आहे..''

''पण हे जर अंतिम ध्येय तुम्हाला साध्य करायचं असेल तर, तर आधी हिंदुस्तान वर नितांत प्रेम करणाऱ्या राष्ट्र निष्ठांना एकत्र आणायची गरज आहे. त्या राष्ट्र निष्ठांना मी हिंदू म्हणतो..'' असे विचार पोंक्षे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com