देशासाठी लढायला निघाल्या होत्या लता मंगेशकर..पण सावरकर म्हणाले.. Sharad Ponkshe Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Ponkshe Shares One memory about Sawarkar And Lata Mangeshkar,Video Viral

Sharad Ponkshe: देशासाठी लढायला निघाल्या होत्या लता मंगेशकर..पण सावरकर म्हणाले..

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्यासोबतच ते उत्तम वक्ते आहेत. शरद पोंक्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांना पूजतात,त्यांच्या विचारांनी चालतात हे आता आपल्यासाठी काही नवीन नाही. पोंक्षे त्यांच्या यु ट्यूब वाहिनीवर नेहमी सावरकरांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत अनेक किस्से सांगताना दिसतात.

शरद पोंक्षे यांची सावरकरांच्या विचारांवरील अनेक व्याख्यानं आपल्याला त्यांच्या युट्यूब वाहिनीवर पहायला मिळतात. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ जोरदार सोशल मीडियावर गाजतोय ज्यात त्यांनी लता मंगेशकर आणि सावरकर यांच्यातील संवादाचा एक किस्सा शेअर केला आहे. (Sharad Ponkshe Shares One memory about Sawarkar And Lata Mangeshkar,Video Viral)

हेही वाचा: Pakistan: 'इथं सिनेमात काम हवं तर...'; पाकिस्तानी अभिनेत्रीनं केली आपल्याच देशाची पोलखोल

शरद पोंक्षे आपल्या त्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत,''एकदा लता मंगेशकर सावरकरांना म्हणाल्या,तात्याराव मला पण तुमच्या त्या अभिनव भारत संघटनेमध्ये यायचंय, क्रांतीकार्यात सहभागी व्हायचंय'. तात्याराव म्हणाले,वेडी आहेस का तू? तुला गाणं दिलंय परमेश्वराने प्रत्येकानं क्रांती केलीच पाहिजे अन् ती हातात शस्त्र घेऊनच केली पाहिजे हा फार चुकीचा समज आहे. क्रांती फार वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तू अजिबात आमच्या अभिनव भारत संघटनेत येऊ नकोस,स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस.तुला जे दिलंय परमेश्वरानं त्याचा वापर कर.आणि हिंदुस्थानातील लोकांना तुझ्या गाण्यातून आनंद देण्याचं काम कर. तुझ्या गाण्याने देशाची सेवा कशी करता येईल याचा विचार कर''.

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय पहायला मिळतात. त्यांचे व्हिडीओ,पोस्ट अनेकदा व्हायरल होतात अन् वादातही सापडतात. शरद पोंक्षेंना ट्रोलही केलं जातं. पण मागे हटतील ते पोंक्षे कुठले. ते नेहमीच सावरकरांच्या विचारांनी प्रेरणा घेत बोलतात,अन त्यानुसार वागतात. काही दिवसांपूर्वीच भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरां संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पोंक्षेनी थेट अंदमानातून व्हिडीओ पोस्ट करता राहूल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?