Sharad ponkshe: सावध राहा! 'हलाल'चं संकट दारात उभं आहे.. मुस्लिम ट्रेडमार्क विषयी शरद पोंक्षे स्पष्टच बोलले..

शरद पोंक्षे यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल..
sharad ponskhe requests everyone to dont use halal certified islamic products viral video
sharad ponskhe requests everyone to dont use halal certified islamic products viral videosakal

sharad ponkshe on halal : काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती 'हलाल'ची. 'हलाल' हा इस्लामी ट्रेड मार्क असून मुसलमान समाजाने याच ट्रेडमार्क च्या वस्तू घ्याव्यात यासाठी 'हलाल'ची निर्मिती केली गेली. यातून मिळणारा पैसा इस्लाम राष्ट्रांना जात असल्याने त्यावरून भारतात बरेच वाद झाले, त्यावर टीका झाली.

भारता सारख्या राष्ट्राला हे किती धोक्याचे आहे याबाबत अनेकांनी आपले मत मांडले. पण हे संकट गेलेलं नाही. अजूनही 'हलाल'चे प्रॉडक्ट येत आहेत. म्हणून शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा 'हलाल वर टीका केली आहे. हे भारतासाठी संकट असल्याचे ते म्हणाले आहेत.

(sharad ponskhe requests to dont use halal certified islamic products its dangerous for india viral video )

sharad ponskhe requests everyone to dont use halal certified islamic products viral video
Prasad Khandekar Birthday: 'ती' घटना घडली नसती तर आज प्रसाद खांडेकर 'हास्यजत्रा' नाही तर IPL गाजवत असता..

त्याबाबत शरद पोंक्षे आपल्या भाषणात म्हणाले, ''गेली वीस- पंचवीस वर्षातलं सर्वात मोठं संकट आज आपल्या उंबऱ्याशी येऊन उभं आहे ते म्हणजे 'हलाल'.. आता हळूहळू ५६ मुस्लिम राष्ट्रांमध्ये तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट विकायचं असेल तर त्यावर 'हलाल'चा स्टॅम्प असणं गरजेचं आहे.''

''त्यांनी त्यांच्या देशात काय विकायचं आहे त्यांचा प्रश्न आहे. आपणही आपल्या देशात आपला 'आयएसआय' स्टॅम्प वापरतो. पण आता हे प्रकरण केवळ इस्लाम राष्ट्रात नाही तर जगभरात पसरू लागलं आहे. एवढंच नाही तर भारतातही काही दुकानांमध्ये 'हलाल' स्टॅम्प असलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत.. जे अत्यंत धोक्याचं आहे.'' अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी धोक्याची सूचना दिली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत असतात. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.

इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. अशाच त्यांच्या व्याख्यानातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com