Bollywood: अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं! |Sharadha Kapoor share post lata Mangeshkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lata mangeshkar and shardha kapoor
Bollywood: अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं!

Bollywood: अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं!

Lata Mangeshkar: भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passed Away) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. यानंतर देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी दीदींना आदरांजली वाहिली. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रेटींचाही (Bollywood News) समावेश होता. दीदींच्या अंतिम प्रवासाच्या प्रसंगी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरही(Bollywood Actress Shradha Kapoor) हजर होती. यावेळी दीदी आणि श्रध्दा कपूर यांच्या अनोख्या नात्याविषयी सोशल मीडियावर (Viral social media) चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले आहे. आता अभिनेत्री श्रद्धा कपूरनं एक खास पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे. दीदींप्रती खास भावना व्यक्त केल्या आहेत.

श्रद्धानं यावेळी बालपणीचा लतादीदींसोबतचा दुर्मिळ फोटो शेअर (Bollywood Celebity News) केला आहे. सोबतच त्यांचे इतरही काही दुर्मिळ फोटो आहेत. चाहते या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात. आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही श्रद्धा ओळखली जाते. आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आताही तिने एक खास पोस्ट 'कू'वर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Viral Video: धोतरातल्या आबांचा 'उत्साह' विराटलाही लाजवणारा

आठ दशके अखंड गात रसिकांना मुग्ध करणाऱ्या प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारी सुरेख पोस्ट श्रद्धा कपूरने केली आहे. यात ती म्हणते, 'मी लताजींसह काही क्षण घालवले होते. ते क्षण मी कायमच माझ्या ह्रद्यात जपून ठेवेन. लतादीदी, मला आठवतं, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. किती आश्वासक नजर आणि प्रेमळ शब्द होते तुमचे... खरोखर एक साधं तरीही दैवी, रुबाबदार आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व! लव्ह यू लताजी!'

हेही वाचा: Lata Mangeshkar: आजींसाठी श्रद्धा कपूरची भावनिक पोस्ट!

Web Title: Sharadha Kapoor Share Post Lata Mangeshkar Rare Photos

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..