Shark Tank India: नमिताच्या घरात चोरी..काय आहे नेमकी भानगड? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shark Tank India
Namita Thapar

Shark Tank India: नमिताच्या घरात चोरी..काय आहे नेमकी भानगड?

'शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या सर्वात लोकप्रिय शार्क नमिता थापर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच अशी एक पोस्ट नमिताच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली जी पाहून सगळेच थक्क झाले.

इतकेच नाही तर नमिता थापरचा इन्स्टाग्राम बायोही या काळात बदलण्यात आला होता. आता या नमिताने स्वत: पुढे येऊन याबाबत माफी मागितली आहे, तसेच आपल्याविरुद्ध असा कट रचणाऱ्या व्यक्तीचे नावही उघड केलं आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: घरातून बाहेर पडताच अब्दु रोजिक-साजिद खानने फराह खानच्या घरी केली जंगी पार्टी

नमिता थापरच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, या पोस्टमध्ये नमिताच्या मुलाने आपल्या आईची बदनामी केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी नमिताचा मुलगा आहे. मी फक्त जगाला हे दाखवू इच्छितो की तुम्ही टीव्हीवर ज्या व्यक्तीला पाहता ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात तशी नाही. तिला लवकरात लवकर अनफॉलो करा. योग्य वेळ आल्यावर मी याचा खुलासा नक्कीच करेन.” इतकंच नाही नमिताच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या खाली ‘वाईट आई आणि वाईट पत्नी’असे करण्यात आलं होतं.

हेही वाचा: Urfi Javed: हमसे दुर और दफा रहो... म्हणत उर्फीनं थेट इशाराच दिला..आता काही खरं नाही!

ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर खुद्द नामिताने यावर स्पष्टीकरण देत याविषयी ट्वीट केलं. नमिताने ट्वीटमध्ये लिहिलं की, “एखाद्याबद्दलचा द्वेष ही गोष्ट लोकांसाठी आणि जगासाठी फार घातक आहे. मोलकरणीने माझा फोन चोरला आणि सोशल मीडियावर माझ्याविषयी अशी पोस्ट शेअर केली. मी एक सेलिब्रिटी आहे आणि त्याचीच ही किंमत मला चुकवावी लागत आहे. याबद्दल मी तुमची माफी मागते.”

हेही वाचा: Rakhi Sawant: असा कसा रे तु आदिल! रडून रडून राखीची अवस्था वाईट

नमिताच्या या ट्वीटनंतरही लोकांचा यावर विश्वास बसत नाहीये. त्यांनी ट्वीट करत नमिताला चांगलंच ट्रोल केलं आहे. “आजच्या काळात मोबाईलचा पासवर्ड आपल्या मुलाला किंवा जोडीदाराला सुद्धा ठाऊक नसतो, अशात मोलकरणीला कसं काय ठाऊक असेल?” असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नमिता सध्या ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. ती एमक्योर फार्मास्यूटिकल्स या कंपनीची डायरेक्टर आहे.

टॅग्स :Entertainmenttv