ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना का ओरडल्या होत्या लता मंगेशकर

अभिनेत्रीला गानसम्राज्ञीने क्रिकेटविषयी प्रश्न विचारला असता उत्तर देणं जमलं नव्हतं.
Lata Mangeshkar, Sharmila Tagore
Lata Mangeshkar, Sharmila TagoreGoogle
Updated on

लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचं क्रिकेटवेड आपल्या सगळयांनाच माहित आहे. क्रिकेटच्या मॅचेस त्या तासनतास आवडीनं पहायच्या. एकदा त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या,''मी चौकार-षटकारावर अगदी लहान मुलाप्रमाणे ओरडते. मला आनंद होतो. समोरच्या संघाची विकेट आपल्या संघानं काढली की त्यापेक्षा वगेळा आनंद तो काय''... असं त्या कायम म्हणायच्या. सचिन तेंडुलकर या क्रिकेट जगतातील हिरोविषयी तर त्यांना निस्स्मि प्रेम होतं. तर याच लता मंगेशकर यांच्या क्रिकेट प्रेमाविषयीचा एक किस्सा ज्येष्ठ अभिनेत्री लता मंगेशकर यांनी सांगितला आहे.

Lata Mangeshkar, Sharmila Tagore
केवळ 'भीम' म्हणूनच नाही तर प्रविण कुमार 'या' कामगिरीमुळेही ओळखले जायचे

त्या म्हणाल्या,''एकदा लता दीदींनी मला क्रिकेटविषयी एक प्रश्न विचारला होता. आणि मला त्याचं उत्तर देणं जमलं नाही तेव्हा त्या माझ्यावर ओरडल्या होत्या''. खरंतर शर्मिला टागोर या क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या पत्नी असूनही त्यांना उत्तर देता आले नाही म्हणून लता दीदींनी शर्मिला टागोर यांना चांगलं खडसावलं. शर्मिला टागोर म्हणाल्या,''मला उत्तर देता आलं नाही म्हणून लता मंगेशकर मला दरडावून बोलल्या,तुला हे माहित असायला हवं''. तेव्हा मी पटकन बोलले,''माझा नवरा क्रिकेटर आहे,मी नाही''. तेव्हा लगेच क्रिकेटप्रेमी लता म्हणाल्या,''म्हणून काय झालं,तरीही तुला माहित असणं गरजेचं आहे''. लता मंगेशकर यांनी क्रिकेटजगताला आर्थिक सहाय्य केल्याचंही आता अनेकांना माहित झालंच असेल. १९८३ साली वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेट टीमलाही त्यांनी जवळजवळ २० लाख रुपयाचं सहाय्य केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com