Viral Video: भर मुलाखतीत नातीवर चिडल्या शर्मिला टागोर..'तुझं मत विचारलेलं नाही..' म्हणत साराला केलं चूप Sharmila Tagore & Sara Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmila Tagore & Sara Ali Khan

Viral Video: भर मुलाखतीत नातीवर चिडल्या शर्मिला टागोर..'तुझं मत विचारलेलं नाही..' म्हणत साराला केलं चूप

Sharmila Tagore & Sara Ali Khan : बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा 'गुलमोहर' सिनेमा डिस्ने हॉट स्टार वर रिलीज होत आहे. तर शर्मिला टागोर यांची नात अभिनेत्री सारा अली खानचा 'गॅसलाइट' सिनेमा ३१ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाणार आहे.

आणि यानिमित्तानेच आजी-नातीच्या या जोडीला एकत्र बोलवण्यात आलं होतं. समोर आलेल्या मुलाखतीच्या क्लीपवरनं दोघी एकमेकींशी वाद घालताना दिसत आहेत.

आता प्रश्न हा उठतो की मुलाखती दरम्यान असं काय घडलं की आजी-नातीत वाद रंगला..चला जाणून घेऊया.(Sharmila Tagore Gulmohar And Sara Ali Khan Gaslight Movie)

मुलाखती दरम्यान सारा आणि शर्मिला यांना विचारलं गेलं की त्यांच्यात सीक्रेट टॅलेंट काय आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना शर्मिला टागोर म्हणाल्या की,'' सीक्रेट चं तर माहीत नाही पण स्वयंपाक करणं माझं पॅशन आहे''.

ही गोष्ट ऐकून सारा हैराण झाली. शर्मिला पुढे म्हणाल्या,''त्या नेहमी नव-नवीन रेसिपी ट्राय करत असतात. आणि वेगवेगळ्या लोकांना त्या चाखायला देत असतात''.

यानंतर स्वतःच्या स्वयंपाकाला १०० पैकी ४० गुण त्यांनी दिले. तेव्हा सारा म्हणाली, ''हे तर फेल होण्यासारखं आहे''.

शर्मिला थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या,''मला तुझं मत नको आहे. मला माहितीय की मी एक चांगली कूक नक्की बनेन''.

तेव्हा सारा म्हणाली,''बडी अम्मी तुम्ही सिनेमातील कथांमध्ये बिझी रहा...जेवणाचं राहू दे''.

हेही वाचा: बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

याव्यतिरिक्त मुलाखती दरम्यान दोघींना विचारलं गेलं की जर त्यांनी अभिनयात एन्ट्री नसती केली तर काय केलं असतं?

याचं उत्तर देत सारा म्हणाली की, तिनं लॉ मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे तिनं त्यातच आपलं करिअर केलं असतं.

तर शर्मिला टागोर म्हणाल्या की, त्या आपल्या कुटुंबाप्रमाणेच शांतिनिकेतनला गेल्या असत्या आणि कदाचित एक आर्टिस्ट बनल्या असत्या.