
'पाहिले न मी तुला' या मालिकेतील नकारात्मक भूमिकेसाठी शशांकला ट्रोल करण्यात येत आहे.
ट्रोलिंगविरोधात शशांक केतकरची पोस्ट; मराठी कलाकारांनी दिला पाठिंबा
सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते एकमेकांच्या आणखी जवळ आले आहेत. चाहत्यांना त्यांच्या लाडक्या कलाकारांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहायला मिळतं, तर सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या आयुष्याशी निगडीत फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. मात्र अनेकदा सेलिब्रिटींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराला त्याच्या कपड्यांवरून, भूमिकेवरून, फोटोवरून किंवा त्याने मांडलेल्या मतावरून ट्रोल करण्याचं प्रमाण आता खूपच वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शशांक केतकरने एका ट्रोलरला सोशल मीडियावर खडेबोल सुनावले होते. 'पाहिले न मी तुला' या मालिकेत शशांक साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकेवरून एका नेटकऱ्याने शशांकला ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा शशांकने नेटकऱ्यांना ट्रोलिंगवरून सुनावलं आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोशल मीडियाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे शशांकची पोस्ट?
'तुम्हाला माहित आहे का? तुम्ही नकारात्मक कमेंट न करताही एखादी नावडती पोस्ट सहज स्क्रोल करु शकता', अशी उपरोधिक पोस्ट त्याने शेअर केली आहे. याचाच अर्थ, आपल्याला नावडत्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मत मांडणं किंवा ट्रोल करणं गरजेचं नसतं, असं शशांकने ट्रोलर्सना सांगितलं आहे.
हेही वाचा : मृण्मयी देशपांडेचा मुंबईला 'Good Bye'
शशांकच्या या पोस्टला इतर कलाकारांकडूनही पाठिंबा मिळाला आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने त्यावर कमेंट केली, 'मी ही पोस्ट सेव्ह करत आहे'. तर 'रंग माझा वेगळा' मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेनं लिहिलं, 'आपल्यातून काहीतरी वाईट बाहेर आणण्यासाठी हेतुपुरस्सर लोक भडकावण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांच्या स्थानी राहून पाहावं, ही संकल्पनाच हरवत चालली आहे. तू खंबीर राहा'. अभिनेता संग्राम सामेळनं 'वाह' असं म्हणत शशांकचं कौतुक केलं.
Web Title: Shashank Ketkar Shares Quirky Post Negative Social Media Comments
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..