
Shatrughan Sinha: तर शोले मध्ये गब्बर सिंग शत्रुघ्न सिन्हाच असते...'या' कारणामुळे दिला होता नकार
एका वृत्तसमुहानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा कोलकाता इथं गेले होते. या इव्हेंटमधील एका खामोश नावाच्या सेशन दरम्यान ७०-८० च्या दशकात सुपरस्टार राहिलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या करिअरविषयी मनमोकळा संवाद साधला.
तसेच त्यांनी कोणते चित्रपट न केल्याबद्दल त्यांना अजूनही पश्चाताप होतो. यासोबतच त्यांनी यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेल्या भांडणाबद्दलही सांगितले.
मॉडरेटर श्वेता सिंग यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना विचारले की, त्यावेळी दोन स्टार्समध्ये इगो क्लॅश होणे ही एक सामान्य गोष्ट होती आणि त्या गोष्टी काळाबरोबर बदलतात का? यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले - होतात भांडण, तरुणाईचा उत्साह असतो. चाहते वेगवगेळे असतात. चाहते तुम्हाला दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवतात. कधीकधी असे होते की आपली प्रशंसा जास्त केली जाते. तर कधी इतरांना सांगितले जाते की तुम्ही चांगले आहात. आज जर तुम्ही मला विचाराल की माझे कोणाशी वैर आहे का, तर नाही, असे काही नाही.
यानंतर त्यांना विचारण्यात आले की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे भांडण झाले होते का. यावर शत्रुघ्न म्हणाले की, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तरुणाईचा उत्साह होता. आमची मैत्री खूप जुनी आहे. आमच्या दोघांमध्ये भांडण व्हायचे, पण आता ते नाही. त्यावेळी प्रसिद्धी जास्त होती, पण काळाबरोबर गोष्टी चांगल्या होत गेल्या.
सत्रादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी उघड केलेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे 'दीवार' हा चित्रपट त्यांच्यासाठीच लिहिला गेला होता. त्यांना विचारण्यात आले की, त्यांना कोणते चित्रपट न केल्याचा पश्चाताप होतो. किंवा त्यांना कोणते चित्रपट करायचे होते.
यावर शत्रुघ्न सांगतात की, त्यांना 'दीवार' चित्रपट न केल्यामुळे खेद वाटतो. ते म्हणाले की हा चित्रपट माझ्यासाठी लिहिला गेला होता. त्याची स्क्रिप्ट माझ्याकडे ६ महिने होती. मतभिन्नता असल्याने मला त्यात काम करता आले नाही.
पुढे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांना शोलेची ऑफरही देण्यात आली होती. ते म्हणाले की मी गब्बरची भूमिका करावी अशी निर्मात्यांची इच्छा होती. मला शोले करायचे होते. पण डेट्सची अडचण होती. रमेश सिप्पी सांगू शकले नाहीत. माझ्याकडे खूप चित्रपट होते. मला ते जमत नव्हते.
"मला शोर या चित्रपटात प्रेमनाथची भूमिका करायची होती. माझ्याकडे चार महिन्यांचा वेळ मागितला होता, पण तो करू शकलो नाही.आजपर्यंत मला खेद वाटतो. मनोजकुमार घरी यायचा, तो म्हणायचा का करत नाही. मी म्हणायचो, मी काय करू शकत नाही. पण त्यात काम करणारे लोक चांगले होते याचा मला आनंद आहे. त्या दोन चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला आणि स्टार बनले याचा मला आनंद आहे".