शहनाजचा डान्स कव्हर फुल्ल टू हीट ; तासाभरात 70 हजारापेक्षा अधिक व्ह्युज  

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

बिग बॉसच्या मागच्या पर्वातील ती स्पर्धक होती. त्यावेळी ती लोकप्रिय झाली होती. त्या स्पर्धेच्या निमित्तानं तिला वेगळी ओळख मिळाली होती.

मुंबई - मॉडेल आणि अभिनेत्री शहनाज गिल सध्या फॉर्मात आली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हीट झाला आहे. शहनाजनं त्या व्हिडीओला डान्स कव्हर असे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्या व्हिडिओला तासाभरात 70 हजारापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी शहनाज आता व्टिटरच्या ट्रेडिंगचा विषय आहे.

बिग बॉसच्या मागच्या पर्वातील ती स्पर्धक होती. त्यावेळी ती लोकप्रिय झाली होती. त्या स्पर्धेच्या निमित्तानं तिला वेगळी ओळख मिळाली होती. आता शहनाज वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिला कायम चर्चेत राहायला आवडते. मागे तिचा किसिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन ती मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाली होती. यासगळ्याचा शहनाजवर काही एक परिणाम झालेला दिसला नाही.

याउलट ती अधिक उत्साहानं पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली होती. काही तासांपूर्वी तिनं व्टिटरवर तिच्या डान्सचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून आले आहे. त्यानंतर युट्युबवर देखील हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी शहनाजला कमेंट दिल्या आहेत.

मम्मा लगीन..! बिग बॉसच्या घरात नागपूरकर राहुल वैद्यने लाजत आईला केला प्रश्न

शहनाज आणि सिध्दार्थ शुक्ला यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येत असते. मागे शहनाजनं त्याला फ्लाईंग किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचं प्रेम सोशल मीडियावर रंगलं होतं. त्यावर दोघांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. शहनाजचा आता जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ती ओ बाबूजी किस्मत की हवा कभी नरम कभी गरम या गाण्यावर तिनं डान्स केला आहे. तो कमालीचा लोकप्रिय होताना दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shehnaaz dance Cover released on social media fans loving it