मम्मा लगीन..! बिग बॉसच्या घरात नागपूरकर राहुल वैद्यने लाजत आईला केला प्रश्न

प्रशांत रॉय
Monday, 11 January 2021

सगळ्या स्पर्धकांच्या मोजक्या नातेवाईकांना एकूण शंभर मिनिटे देण्यात आली होती. आमच्या वाटेला ११ मिनिटे आली. खूप दिवसांनी मुलगा भेटल्यामुळे मन आनंदी होते. दोघांनाही गहिवरून आले होते. त्यामुळे प्रारंभीची काही मिनिटं त्यातच निघून गेली.

नागपूर : तब्बल शंभर दिवसांनी भेट... ती सुध्दा केवळ ११ मिनिटे... दोघांच्यामध्ये काच आणि कानाला फोन... चार पाच मिनिटे तर अत्यानंदाने काही न बोलताच संपली... कसेबसे शब्द फुटले... घडाळ्याचा काटा पुढेपुढे सरकत होता... तोच पलीकडून प्रश्न कानावर पडला ‘मम्मी, माझं लग्न कधी करणार?’ 

बिग बॉसचा १४ वा सीजन सुरू आहे. नागपूरकर राहुल वैद्य यामध्ये सहभागी आहे. बुधवारी (ता. ६) राहुलची आई गीता वैद्य यांना बिग बॉसच्या घरात प्रवेशाची संधी मिळाली. त्यावेळी राहुल आणि त्यांच्यामध्ये काय संवाद झाला याची ‘सकाळ'ला माहिती दिली. गीता म्हणाल्या, अनेक दिवसांनी भेट होत असल्यामुळे खूप एक्साइटमेंट होती.

जाणून घ्या - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन् हृदयाचा ठोका चुकला

सगळ्या स्पर्धकांच्या मोजक्या नातेवाईकांना एकूण शंभर मिनिटे देण्यात आली होती. आमच्या वाटेला ११ मिनिटे आली. खूप दिवसांनी मुलगा भेटल्यामुळे मन आनंदी होते. दोघांनाही गहिवरून आले होते. त्यामुळे प्रारंभीची काही मिनिटं त्यातच निघून गेली. भावभावनांचा कल्लोळ कमी झाल्यानंतर त्याने घरच्यांची विचारपूस केली.

तयारी सुरू केली आहे

येथील वातावरणाशी राहुलने चांगले जुळवून घेतले असून, स्पर्धा जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे तो म्हणाला. शेवटी त्याने काहीसे लाजतच प्रश्न केला, ‘मम्मा माझं लग्न कधी करणार गं?’ त्याचा हा प्रश्न मला काहीसा अपेक्षितच होता. मी त्याला म्हटलं, ‘अरे तू स्पर्धा जिंकून बाहेर तर ये, आम्ही तर तुझ्या लग्नाची तयारी आधीच सुरू केली आहे’. राहुलने टीव्ही ॲक्ट्रेस दिशा परमार हिला प्रपोज केले असून, तिच्याशी लग्न करणार आहे.

जाणून घ्या - (Video) Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले

नागपूरचे मोठे आकर्षण

राहुलचे वडील कृष्णा वैद्य एमएसईबीमध्ये इंजिनिअर आहेत. आई गृहिणी असून श्रुती नावाची त्याला मोठी बहीण आहे. राहुलचा जन्म नागपुरात तर त्याचे शिक्षण मुंबईत झाले आहे. राहुलने इंडियन आयडॉलमध्ये दुसरा क्रमांक मिळविला होता. मुंबईत राहुनही राहुलला नागपूरचे मोठे आकर्षण असल्याचे गीता यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Vaidya from Nagpur questioned his mother at the house of Bigg Boss