Kartik Aaryan: कार्तिक आर्यनने उडवली 'शेहजादा'ची पतंग, कच्छच्या रणमध्ये चाहत्यांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनने उडवली 'शेहजादा'ची पतंग, कच्छच्या रणमध्ये चाहत्यांची गर्दी

आज 15 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण देश मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहे. त्याची लोकप्रियता चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत पाहायला मिळत आहे. लोक पतंग उडवून हा दिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत. बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन देखील त्याच्या चाहत्यांसोबत हा दिवस साजरा करताना कॅमेऱ्यात कैद झाला. तो कच्छला पोहोचला. जिथे सर्वात मोठा पतंग महोत्सव होत होता. येथे तो एक लाख चाहते आणि अनेक आंतरराष्ट्रीय पतंग उडवणाऱ्यांमध्ये दिसला.

हेही वाचा: Sonam Kapoor On Mumbai : 'काय ती मुंबईची अवस्था! मला तर...' सोनम कपूर बोलली, नेटकऱ्यांनी काढला जाळ

कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तेलुगू चित्रपट 'अला वैकुंठप्रेमुलु' चा हिंदी रिमेक चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता त्याच्या प्रमोशनसाठी कलाकार जागोजागी फिरत आहेत. यापूर्वी ते पंजाबमधील जालंधर येथे गेले होते. येथे तो क्रिती सेननसोबत दिसला होता. दोघांनी भांगडा देखील केला. आता तो गुजरातला पोहोचला. येथील कार्तिकचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यनच्या आलेल्या व्हिडिओमध्ये तो लाखोंच्या गर्दीत कारच्या छतावर उभा राहून पतंग उडवत आहे. त्या पतंगावर क्राउन बनवला असून त्यावर शहजादा असे लिहिले आहे. होय, इथे तो त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करतोय पण वेगळ्या पद्धतीने. त्याचवेळी त्याला पाहण्यासाठी जमलेली चाहत्यांची गर्दी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन स्टेजवर जात असताना त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची गर्दी अनियंत्रित होते.

कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले - 'अजून एक रिमेक, एकाने लिहिले - मित्रा, हा चित्रपट साईन करायला नको होता. अल्लू अर्जुनचा रिमेक करून तू चूक केलीस. तो चित्रपट एक उत्कृष्ट नमुना होता'.