शेखर सुमन Movers & Shakers मधून करणार कमबॅक?; पोस्ट करुन दिली Hint Shekhar Suman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Suman

शेखर सुमन Movers & Shakers मधून करणार कमबॅक?; पोस्ट करुन दिली Hint

शेखर सुमन (Shekhar Suman) गेल्या तीन दशकांपासून मनोरंजन सृष्टीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मग तो सिनेमा असो,टी.व्ही असो की स्टेज शो या सर्वच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेखर सुमन यांनी आपलं नाव कमावलं आहे. भारतातच नाही तर जगभरातील आपल्या चाहत्यांचे त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून मनोरंजन केले आहे. शेखर सुमन लवकरच मनोरंजन क्षेत्रात कमबॅक करीत आहेत. आणि या बातमीनं त्यांचे चाहते मात्र सुखावले आहेत. आता चाहते वाट पाहत आहेत ते आपल्या या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी.

शेखर सुमन ने आपल्या चाहत्यांना हिंट देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे,ज्यामध्ये त्यांनी अनेक वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करण्याविषयी म्हटलं आहे की,'लाइट्स , साऊंड, कॅमेरा, खूप सारी अॅक्शन...'. ही पोस्ट खास शेखर सुमन यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी केली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की शेखर सुमन यांनी इन्स्टाग्रामवर केलेली ही पहिलीच पोस्ट आहे.

हेही वाचा: सोनाक्षीचा साखरपुडा खरंच झालाय का? अभिनेत्रीचा व्हिडीओतून मोठा खुलासा

शेखर सुमन 'देख भाई देख','पोल खोल','मूवर्स अॅन्ड शेखर्स' सारख्या कितीतरी कार्यक्रमांमुळे शेखर सुमन एकेकाळी चर्चेत होते. याव्यतिरिक्त शेखर सुमन यांनी 'उत्सव', 'संसार', 'त्रिदेव' ,'नाचे मयूरी' सारख्या सिनेमांतूनही त्यांनी साकारलेल्या भूमिकांची चर्चा झाली होती.

Web Title: Shekhar Suman Comback In Entertainment Industrypost

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top