सोनाक्षीचा साखरपुडा खरंच झालाय का? अभिनेत्रीचा व्हिडीओतून मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonakshi Sinha

सोनाक्षीचा साखरपुडा खरंच झालाय का? अभिनेत्रीचा व्हिडीओतून मोठा खुलासा

सोनाक्षी सिन्हाच्या(Sonakshi Sinha) लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता अभिनेत्रीनं या बातम्यांवर खुलासा केला आहे. पण हा खुलासा केल्यामुळे तिचे चाहते खूशही आहेत आणि थोडे नाराजही झाले आहेत. तर त्याचं झालं असं की,मिस्ट्रीमॅनसोबत सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha) साखरपुड्याची बातमी व्हायरल होत असतानाच आता बातमी आहे की अभिनेत्रीनं आर्टिफिशियल नेल ब्रॅंड लॉंच केला आहे. चाहत्यांसोबत तिनं ही गूडन्यूड इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोनाक्षीनं SOEZI नावाचा आर्टिफिशियल नेल ब्रॅंड सुरु केला आहे. यामुळे आता सोनाक्षीचा देखील अशा अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला आहे ज्या प्रत्यक्ष आयुष्यात उद्योजिका म्हणूनही नाव कमावत आहेत.

हेही वाचा: विदेशवारीसाठी जॅकलिनची कोर्टात धाव; ईडीनं दिला होता दणका

काही दिवस आधी सोनाक्षी सिन्हा एका मिस्ट्रीमॅनसोबत आपली साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसली होती. पण प्रत्यक्षात ती साखरपुड्याची(Engagement) अंगठी नव्हतीच,खरंतर सोनाक्षी आपल्या नेलब्रांडचं प्रमोशन करत होती. लग्नाच्या बातम्यांवर सोनाक्षीनं काही स्पष्ट केलं नसलं तरी SOEZI संबंधित पोस्ट शेअर करीत तिनं सगळ्यांनाच एक छान सरप्राइज दिलं आहे. आणि नकळत साखरपुड्याच्या बातमीवर पडदा टाकला आहे.

हेही वाचा: 'शाहरुखच्या मॉलमध्ये रणवीर सिंगचं दुकान'; काय आहे भानगड?

आर्टिफिशियल नेलचे प्रेमींसाठी सोनाक्षीचं हे नेल ब्रॅंड मोठं गिफ्ट ठरेल. तरुण मुलींच्या आवडी आणि गरजा बरोबर लक्षात घेऊन सोनाक्षीनं SOEZI या आपल्या ब्रॅंडच्या आर्टिफिशियल नेलच्या किमती देखील कमी ठेवल्या आहेत. म्हणजेच सोनाक्षी सिन्हाच्या ब्रॅंडचे नेल्स खूप महाग नाहीत. तिनं याची किमत अशी ठेवलीय की कोणतीही मुलगी आर्टिफिशियल नेल घालून मिरवण्याचं आपलं स्वप्न सहज पूर्ण करेल.

सोनाक्षी एकटी अशी अभिनेत्री नाही,जिनं बिझनेस सुरु करण्याचं ठरवलं आहे. सोनाक्षी व्यतिरिक्त अनुष्का शर्मा,कतरिना कैफ,आलिया भट्ट,सोनम कपूर,रिया कपूर यांची नावं बिझनेस करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहेत. एकीकडे जिथे कतरिना 'के ब्यूटी' ची मालकीण आहे. तिथे आलिया कपड्यांच्या ब्रॅंडचा बिझनेस सांभाळते. आता सोनाक्षी लग्न करेल तेव्हा करेल पण नव्या बिझनेसची मालकीण बनून आपलं नाव बिझनेस वूमन बनून मोठं करो अशा शुभेच्छा.

Web Title: Sonakshi Sinha Engagement Truth Social Media Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top