ऑस्करसाठी 'शेरनी', 'सरदार उधम सिंग' रेसमध्ये; १४ सिनेमांतून होणार एकाची निवड

कोलकात्यात ज्यूरींकडून निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात
Oscar news
Oscar news
Updated on

कोलकाता : गेल्या दोन वर्षात थिएटर बंद असतानाही चांगल्या भारतीय सिनेमांच्या निर्मितीत खंड पडलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या अॅकॅडमी अॅवॉर्ड्ससाठी अर्थात ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतीय सिनेमाच्या निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरु झाली. यामध्ये १४ सिनेमांची निवड करण्यात आली असून यांपैकी एक सिनेमा ऑस्करला पाठवण्यात येणार आहे.

शाजी एन. करन यांच्या अध्यक्षतेखालील फिल्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या १५ सदस्यांची ज्युरी मिळून ९४ व्या अॅकॅडमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगिरीसाठी एका सिनेमाची निवड करणार आहेत. शॉर्टलिस्ट झालेल्या १४ सिनेमांमध्ये विद्या बालनच्या 'शेरनी' आणि विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंग' या सिनेमांचाही समावेश आहे.

अद्याप अंतिम निवड बाकी

मल्याळम दिग्दर्शक आणि प्रतिष्ठीत सिनेमॅटोग्राफर शाजी एन. करन यांची ज्युरी हे सर्व १४ सिनेमे पाहतील आणि यांपैकी बेस्ट फिल्मसाठी भारताकडून अधिकृत एन्ट्री म्हणून निवड करतील. या १४ चित्रपटांमध्ये मल्याळम फिल्म नायटू, तमिळ फिल्म मंडेला, हिंदीमधील शेरनी आणि सरदार उधम सिंग या सिनेमांचा समावेश आहे. गेल्या वर्षी जोस पेलिसरी यांचं दिग्दर्शन असलेली जल्लीकट्टू ऑस्करसाठी पाठवण्यात आली होती. पण हा सिनेमा ऑस्कर ज्युरीच्या फायनल लिस्टमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. दरम्यान, यंदाचा ऑस्कर सोहळा पुढील वर्षी २७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

शेरनी, सरदार उधमसिंग ओटीटीवर रिलीज

अमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकानं विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला 'शेरनी' सिनेमा बनवला आहे. यामध्ये विद्या बालन एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत असून नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी ती प्रयत्न करत असते, त्यासाठी तिला अनेक सरकारी अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. तर विक्की कौशल याची प्रमुख भूमिका असलेला 'सरदार उधमसिंग' या सिनेमाचं दिग्दर्शन शूजीत सरकारच्या यांनी केलं आहे. हा सिनेमा क्रांतीकारक सरदार उधमसिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. सन १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com